ETV Bharat / bharat

केंद्र सरकार यूएईला करणार 10 हजार टन कांदा निर्यात, या अगोदरही दिला होता 14 हजार 400 टन कांदा - Govt Allows Onion Exports

Govt Allows Onion Exports : देशात कांदा निर्यातबंदी असताना केंद्र सरकारनं बुधवारी यूएईला 10 हजार टन कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. या अगोदरही मागील महिन्यात सरकारनं यूएईला 14 हजार 400 टन कांदा निर्यात केला होता.

Govt Allows Onion Exports
संग्रहित छायाचित्र
author img

By PTI

Published : Apr 4, 2024, 9:46 AM IST

नवी दिल्ली Govt Allows Onion Exports : केंद्र सरकारनं कादा निर्यात करण्यावर बंदी घातली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसून कांद्याचे भाव गडगडले होते. मात्र केंद्र सरकारनं यूएईला अतिरिक्त कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे केंद्र सरकार आता यूएईला 10 हजार टन कांदा निर्यात करणार आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारनं गेल्या महिन्यात यूएईला 14 हजार 400 टन कांदा निर्यात करण्याची परवानगी दिली होती.

यूएईला करणार 10 हजार टन कांदा निर्यात : केंद्र सरकारनं कांद्यावर निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशातील कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. मात्र केंद्र सरकारनं बुधवारी यूएईला 10 हजार टन कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारनं यूएईला कांदा निर्यात करण्यास परवानगी दिल्यानं नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड (NCEL) मार्फत हा कांदा निर्यात करण्यात येणार आहे.

मागील महिन्यात यूएईला दिला 14 हजार 400 टन कांदा : केंद्र सरकारनं मागील महिन्यात यूएईला 14 हजार 400 टन कांदा निर्यात केला होता. त्यानंतर आता पुन्हा केंद्र सरकारनं यूएईला 10 हजार टन कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात एकीकडं कांदा निर्यातबंदी आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. महाराष्ट्रातील अनेक कांदा उत्पादक शेतकरी कांद्याला भाव नसल्यानं आक्रमक झाले होते.

मित्र राष्ट्राच्या विनंतीनुसार सरकार देते परवानगी : केंद्र सरकारनं बुधवारी नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड (NCEL) मार्फत यूएईला अतिरिक्त 10 हजार टन कांदा निर्यात करण्याची परवानगी दिली. याबाबत परकीय व्यापार महासंचालनालयानं एक अधिसूचना जारी केली. या अधिसूचनेत सरकारनं देशात कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. मात्र केंद्र सरकार मित्र राष्ट्रांना त्यांच्या विनंतीनुसार विशिष्ट प्रमाणात माल पाठवण्याची परवानगी देते. भारतानं 1 एप्रिल 2023 ते 4 ऑगस्ट 2023 या कालावधीत 9.75 लाख टन कांद्याची निर्यात केली. भारताचे बांगलादेश, मलेशिया आणि यूएई हे तीन प्रमुख आयातदार देश आहेत. त्यामुळे यूएईच्या विनंतीनुसार हा कांदा निर्यात करण्यात येत आहे, असं स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा :

  1. कांदा निर्यातबंदी 31 मार्चनंतरही कायम, शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट; निवडणुकीत फटका बसणार? - Onion Export Ban
  2. बांगलादेशात 50 हजार टन कांद्याची निर्यात करून शेतकऱ्यांना फायदा होणार नाही- कांदा उत्पादक संघटना
  3. 31 मार्चपर्यंत कांदा निर्यात बंदी कायम, नाशिकमधील शेतकऱ्यांमध्ये संताप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.