नवी दिल्ली FM Niramala Sitharaman : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीय जनता पक्षाचा निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव नाकारलाय. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी लागणारा पैसा नसल्यानं मी हा प्रस्ताव नाकारत असल्याचं त्यांनी सांगितलं.
निवडणूक लढवायला पैसे नाहीत : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आंध्र प्रदेश किंवा तामिळनाडूमधून निवडणूक लढवण्याचा पर्याय दिल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. एका माध्यमाच्या कार्यक्रमात बोलताना भाजपा नेत्या सीतारामन म्हणाल्या, “एक आठवडा किंवा दहा दिवस विचार केल्यानंतर मी हे उत्तर दिलं. माझ्याकडं निवडणूक लढवण्यासाठी लागणारा पैसा नाही. मला आंध्र प्रदेश किंवा तामिळनाडूमध्ये जिंकण्यासाठी वेगवेगळ्या निकषांचा प्रश्न आहे. मला वाटत नाही की, मी ते करण्यास सक्षम आहे."
पक्षाचे आभार- पुढे अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, "माझा युक्तिवाद त्यांनी (पक्षानं) मान्य केला. याबद्दल मी खूप आभारी आहे. म्हणूनच मी निवडणूक लढवत नाही." देशाच्या अर्थमंत्र्यांकडेही लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी पुरेसा पैसा का नाही, असं त्यांना विचारले. त्या म्हणाल्या की, "माझा पगार, माझं उत्पन्न, माझी बचत माझी आहे. तो भारताचा एकत्रित निधी नाही."
अनेक राज्यसभा सदस्य निवडणुकीच्या रिंगणात : अर्थमंत्री निर्मला सीतारामन या कर्नाटकातून राज्यसभेच्या सदस्य आहेत. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपानं पीयूष गोयल, भूपेंद्र यादव, राजीव चंद्रशेखर, मनसुख मांडविया आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासह अनेक राज्यसभा सदस्यांना निवडणुकीच्या रिंगणात उभे केलं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या स्वतः निवडणूक लढवत नसल्या तरी, विविध उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचं त्या म्हणाल्या. 'मी मीडियाच्या अनेक कार्यक्रमांमध्येही सहभागी होणार आहे. प्रचार मोहिमेत सहभागी होणार असल्याचही त्यांनी म्हटलंय.
हेही वाचा :
- भारतीय अर्थव्यवस्थेवर लोकसभेत श्वेतपत्रिका, UPA सरकारच्या घोटाळ्याचा अर्थमंत्र्यांनी वाचला पाढा
- 'चार जातीं'वर लक्ष केंद्रीत करण्याची गरज; निर्मला सीतारामन यांनी स्पष्टच घेतली 'या' 'चार जातीं'ची नावं
- Union Interim Budget 2024 : अर्थसंकल्प अन् निर्मला सीतारामन यांच्या वेगवेगळ्या साड्या; चर्चा तर होणारच!