बिजनौर Father Rapes Daughter : शेरकोट पोलीस ठाण्याच्या परिसरात धक्कादायक प्रकार समोर आलाय. बापानं आपल्या 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली. तो बऱ्याच दिवसांपासून मुलीसोबत बलात्कार करत होता, असं पोलिसांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.
आरोपीविरोधात गुन्हा दाखल : घडलेला प्रकार कुणाला सांगितला तर जीवे मारण्याची धमकीही मुलीला दिली होती. त्यामुळं मुलीनं भीतीच्या धाकानं कोणालाही अत्याचार झाल्याचं सागितलं नाही. मात्र, याबाबत आईला घटनेची माहिती मिळताच तिनं मुलीला विश्वासात घेवून विचारपूस केली. त्यानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यानंतर आईनं आरोपी पतीविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. पीडितेला वैद्यकीय उपचारासाठी पाठवण्यात आलंय.
अनेक दिवसांपासून मुलीवर बलात्कार : 25 एप्रिल रोजी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत महिलेनं (पीडितेची आई) आरोप केला आहे की, "तिची मुलगी 14 वर्षांची आहे. ती दहावीची विद्यार्थिनी आहे. ती बराच वेळ घरात शांत राहत होती. तिचं वागणंही सामान्य वाटत नव्हतं. त्यामुळं तिला विश्वासात घेऊन विचारपूस केल्यावर तिनं घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला." मुलीनं सांगितलं की, "वडील अनेक दिवसांपासून बलात्कार करत होते. त्यांनी मला अनेकदा धमक्याही दिल्या आहेत. त्यामुळं घाबरल्यामुळं मी याबाबतची माहिती कोणालाही दिली नाही."
आरोपीची कारागृहात रवानगी : यानंतर महिलेनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी पीडितेला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात पाठवलंय. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केलीय. आरोपीला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आलं असता त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आलीय. सीओ संग्राम सिंह यांनी सांगितलं की, पत्नीच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली.
हे वाचलंत का :
- आयपीएल सामन्यावर सट्टा; छत्तीसगडमधील तीन सट्टेबाज गजाआड, लाखोंचा मुद्देमाल जप्त - Betting on IPL Match
- पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा! मुलबाळ होत नसल्यानं अघोरी प्रकार, विवाहितेच्या अंगावर ठोकले खिळे, तोंडात कोंबल्या मिरच्या - Woman nailed
- अमरावतीच्या व्यावसायिकाची वाराणसीत आत्महत्या; देवदर्शनाला गेले अन् संपवलं जीवन - Businessman Commits Suicide