ETV Bharat / politics

"जीवन मे असली उडान बाकी है, अभी तो...", एकनाथ शिंदे यांनी शायरीतून सांगितला भविष्यातील 'प्लॅन'

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. त्याचवेळी त्यांनी त्यांना अजून खूप मोठी झेप घ्यायची आहे याचे संकेत दिले.

EKNATH SHINDE SHAYRI
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 2 hours ago

ठाणे : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. त्यानंतर आता राज्यात मुख्यमंत्री कोणाचा असेल यावरून चर्चा रंगली आहे. दरम्यान, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. मुख्यमंत्रिपदासाठी केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेईल, त्या निर्णयाला शिवसेनेचा पाठिंबा असेल, असं ते म्हणाले. तसंच, महायुतीचा भविष्यातील 'प्लॅन' काय असेल याचं उत्तर त्यांनी शायरीतून दिलं.

एकनाथ शिंदेचं शायरीतून उत्तर : "सर्वसामान्य जनतेसाठी शक्य त्या सर्व गोष्टी केल्या. आम्ही घरात बसून राहिलो नाही. केंद्र सरकारकडून लाखो करोडो रुपयांचा निधी आणला आणि यातून महाराष्ट्राला एक नंबरचं राज्य बनवलं," असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसंच यावेळी त्यांनी महायुतीचा भविष्यातील 'प्लॅन' काय असेल हे शायरीतून सांगितलं. "जीवन मे असली उडान बाकी है, अभी तो नापी है मुट्टीभर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है," या शायरीतून एकनाथ शिंदे यांनी भविष्यातील प्लॅन सांगितला.

कार्यकर्त्यांची घोषणाबाजी : एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद सुरू असताना त्यांच्या घराबाहेर कार्यकर्ते "आम्हाला एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री हवेत," अशी घोषणाबाजी करत होते. एकनाथ शिंदे यांच्या पत्रपरिषदेच्या दरम्यान कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जमले होते, त्यामुळं पोलिसांना काही काळ बंगल्याबाहेरचा रस्ता बंद करावा लागला.

पत्रकारांचा पोलिसांशी वाद : पत्रकार परिषदेसाठी राज्यभरातील आणि राष्ट्रीय स्तरावरील मीडिया आली असल्यामुळं तीन वाजता सुरू होणारी पत्रकार परिषद ही चार वाजता सुरू झाली. सुरक्षिततेची चाचणी पोलिसांनी सुरू केल्यानंतर मोठी गर्दी झाल्यामुळं या ठिकाणी गोंधळ उडला आणि काही पत्रकारांचा पोलिसांशी वाद देखील झाला.

पत्रकार परिषदेआधी झाली बैठक : आजच्या पत्रकार परिषदेच्या आधी शिवसेनेच्या नेत्यांनी एक बैठक घेतली. ज्यामध्ये संजय शिरसाठ, प्रताप सरनाईक, दादा भुसे, श्रीकांत शिंदे हे उपस्थित होते. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.

हेही वाचा

  1. ठाकरेंच्या शिवसेनेला निवडणूक आयोगाकडून दिलासा, 'या' मतदारसंघामध्ये होणार फेरमतमोजणी
  2. भाजपाला ना शिंदेंची ना अजित पवारांची गरज? स्वबळावर सरकार स्थापनेसाठी 146 आमदारांचा पाठिंबा, जाणून घ्या समीकरण
  3. एकनाथ शिंदे आजही आणि यापुढेही महायुतीचे नेते असतील - चंद्रशेखर बावनकुळे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.