ETV Bharat / bharat

शेतकरी आंदोलनाचा आज 9 वा दिवस; आतापर्यंत चौघांचा मृत्यू, आंदोलक दिल्लीकडं कूच करण्यास पुन्हा सज्ज - शेतकरी आंदोलनाचा आज 9 वा दिवस

Farmers Protest 2024 : सरकारसोबत चर्चेची चौथी फेरी निष्फळ ठरली आहे. त्यामुळं शेतकरी आज पुन्हा दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न करणार आहेत. शेतकऱ्यांनी दिल्लीत घुसण्याची पूर्ण तयारी केली आहे. तर दुसरीकडं शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलीस दलही सज्ज झालं आहे.

Farmers Protest 2024
संपादित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 21, 2024, 10:46 AM IST

चंदीगड Farmers Protest 2024 : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाचा आज 9 वा दिवस आहे. शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या या आंदोलनात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. यात दोन शेतकऱ्यांचा तर दोन पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. आंदोलनातील शेतकऱ्यांनी पुन्हा जेसीबी, क्रेनची मागणी केली आहे. शेतकरी पुन्हा मोठ्या जोमानं दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळं आज शेतकरी आणि पोलिसांमध्ये चांगलाच राडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शेतकऱ्यांनी ठोकला शंभू सीमेवर तळ : शेतकरी नेत्यांनी राजधानी दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी अश्रूधुरांची नळकांडे फोडली होती. त्यानंतर शेतकऱ्यांनी काही वेळ रस्ता खाली केला. मात्र या शेतकऱ्यांनी शंभू सीमेवर तळ ठोकला आहे. आज सकाळी शेतकरी पुन्हा दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न करणार आहेत. पंजाब हरियाणाच्या सीमेवर असलेल्या शंभू सीमेवर शेतकऱ्यांचा ताफा आज सकाळी 11 वाजता शेतकरी दिल्लीकडं कूच करणार असल्याची माहिती शेतकरी नेत्यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. त्यासह खनुरी सीमेवरुनही शेतकरी हरियाणात दाखल होणार आहेत. तेथून ते ट्रॅक्टरनं दिल्लीकडं कूच करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शंभू सीमेवर 1200 ट्रॅक्टर सज्ज : दिल्लीत घुसण्याची शेतकरी नेत्यांनी पूर्ण तयारी केली आहे. त्यासाठी शेतकरी नेत्यांनी योजना आखली आहे. शेतकरी नेत्यांच्या रणनीतीनुसार सकाळी शंभू सीमेवर 1200 ट्रॅक्टरच्या रांगा लावल्या जाणार आहेत. तर खनुरी सीमेवर 800 ट्रॅक्टर सज्ज आहेत. आज सकाळी सहा वाजता ट्रॅक्टरची ही संख्या होती, मात्र त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शेतकऱ्यांनी मागवले जेसीबी, हायड्रोलिक क्रेन : दिल्लीत घुसण्यासाठी सज्ज असलेल्या शेतकऱ्यांनी आता पुन्हा जेसीबी आणि हायड्रोलिक क्रेनची मागणी केली आहे. पोलिसांनी केलेल्या अश्रूधुरांच्या नळकांड्यांचा त्रास होऊ नये, म्हणून शेतकऱ्यांनी आणखी जोरदार तयारी सुरू केली आहे. शेतकरी अंबाला सीमेवर पोहोचले आहेत. या शेतकऱ्यांनी पोलिसांनी लावलेले सीमेंटचे बॅरिकेड्स तोडण्याची पूर्ण तयारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. सरकारबरोबर चर्चेची चौथी फेरीही निष्फळ; शेतकरी 21 फेब्रुवारीला दिल्लीकडे कूच करणार
  2. शेतकऱ्यांबरोबर चर्चेची चौथी फेरी संपन्न, केंद्र सरकारची भूमिका काय? जाणून घ्या
  3. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याचा हृदयविकारानं मृत्यू, शंभू सीमेवरील दुर्दैवी घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.