जम्मू Doda Encounter : दोडा इथल्या देसा जंगलात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सोमवारी भारतीय सैन्य दलाच्या चार जवानांना वीरमरण आलं. या प्रकरणी भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांची शोधमोहीम सुरू केला. जवानांनी गुरुवारी पहाटे दहशतवाद्यांना शोधण्यात यश आलं. त्यामुळे दोडातील देसा इथल्या जंगलात भारतीय सुरक्षा दलातील जवान आणि दहशतवाद्यांमध्ये गुरुवारी सकाळी चकमक सुरू झाल्याची माहिती सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांकडून दहशतवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे, असंही या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
गुरुवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास सुरू झाली चकमक : दोडा इथल्या देसा जंगलात दहशतवाद्यांनी भारतीय सुरक्षा दलांच्या जवानांवर हल्ला केला. या हल्ल्यात भारतीय सुरक्षा दलाच्या एका कॅप्टनसह चार जवानांना वीरमरण आलं. दोडा जंगलात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबाराची ही तिसरी वेळ आहे. गुरुवारी पहाटे 2 वाजताच्या सुमारास दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये पुन्हा चकमक सुरू झाली, असंही या अधिकाऱ्यांना यावेळी स्पष्ट केलं.
अत्याधुनिक कॅमेऱ्याचा दहशतवाद्यांना शोधण्यासाठी वापर : दोडा इथल्या भाटा देसा परिसरात बुधवारी मध्यरात्री सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये दोन वेळा गोळीबार झाला. त्यामुळे भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांविरोधातील मोहीम तिव्र केली. सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनं सांगितलं की, "गोळीबार 5 मिनिटं चालला, मात्र या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नाही." जम्मू काश्मीरच्या देसा जंगलात भारतीय सैन्य दलातील कमांडो, पोलिसांचं विशेष पथक आणि निमलष्करी दलाच्या संयुक्त पथकानं सलग चौथ्या दिवशी दहशतवाद्यांना शोधण्यासाठी मोहीम सुरू केली. यावेळी जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या जवानांवर गोळीबार केला. या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांकडून अत्याधुनिक कॅमेरे आणि ड्रोनचा वापर केला जात आहे. त्यामुळे दहशतवाद्यांना शोधण्यास मदत होत आहे.
हेही वाचा :
- दोडा एन्काऊंटर : सैन्य दलाच्या जवानांकडून सलग तिसऱ्या दिवशीही दहशतवाद्यांची शोधमोहीम सुरूच - Doda Encounter
- कुलगाममध्ये दोन ठिकाणी चकमक; सहा दहशतवादी ठार, अकोल्याच्या प्रवीण जंजाळ यांच्यासह एका जवानाला वीरमरण - ENCOUNTER IN KASHMIR
- दोडामध्ये भारतीय जवान आणि दहशतवाद्यांची चकमक; सैन्यदलाच्या चार जवानांना वीरमरण - Doda Encounter