ETV Bharat / bharat

तुमचं मतदान कार्ड हरवलंय? काळजी करू नका, 'ही' ओळखपत्र सोबत ठेवून करू शकतात मतदान - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 ची सध्या देशभरात रणधुमाळी सुरू आहे. मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्र असणं आवश्यक आहे. पण, जर तुमच्याकडं मतदान कार्ड नसेल, तर काळजी करू नका. आम्ही तुम्हाला ती 12 कागदपत्रं सांगतोय, ज्याद्वारे तुम्ही मतदान करू शकता.

Lok Sabha Election 2024
फाईल फोटो (ETV Bharat Desk File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 18, 2024, 5:51 PM IST

Updated : May 12, 2024, 5:40 PM IST

हैदराबाद Lok Sabha Election 2024 : राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पाच टप्प्यात होत आहे. मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगानं मतदान ओळखपत्राशिवाय 12 ओळखपत्रे असणाऱ्यांना मतदान करण्यासाठी मान्यता दिली आहे. यापैकी कोणताही एक पुरावा दाखवल्यानंतर तुम्हाला मतदान करता येणार आहे. त्यामुळं मतदार कार्ड नसेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. त्यासाठी ही खालीलपैकी कोणतीही कागदपत्रे घेऊन तुम्ही मतदानाचा हक्क बजावू शकणार आहात.

12 प्रकारच्या ओळखपत्रांना मान्यता : तुमच्याकडं मतदार कार्ड नसल्यास निवडणूक आयोगानं 12 प्रकारच्या ओळखपत्रांना मतदान करण्यासाठी मान्यता दिली आहे. त्यापैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवून तुम्ही तुमचं मत देऊ शकता. त्यामुळं फक्त मतदार कार्डवर तुम्हाला अवलंबून राहण्याची गरज आता राहणार नाही.

मतदार ओळखपत्राशिवायही करता येणार मतदान : निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, ज्यांच्याकडं मतदान ओळखपत्र नसेल त्यांना इतर ओळखपत्र दाखवून मतदान करता येणार आहे. या 12 पर्यायी ओळखपत्रांमध्ये आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स, पॅन कार्ड, भारतीय पासपोर्ट, पेन्शनची कागदपत्रे, केंद्र/राज्य सरकारनं जारी केलेले ओळखपत्र, मर्यादित कंपन्यांना जारी केलेले फोटो असलेले सेवा ओळखपत्र, बँक/पोस्ट ऑफिसनं जारी केलेले फोटो पासबुक, राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर अंतर्गत आरजीआयनं दिलेलं स्मार्ट कार्ड, कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत जारी केलेलं आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, खासदारांनी जारी केलेलं अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयानं दिव्यांग व्यक्तींना दिलेलं आमदार/एमएलसी ओळखपत्राच समावेश असणार आहे.

घरून मतदान कोण करू शकतं? : लोकसभेच्या ५४३ जागांसाठी देशभरात निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावं यासाठी निवडणूक आयोगामार्फत काही नागरिकांना घरबसल्या मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 40 टक्क्यांहून जास्त अपंगत्वाचे निकष पूर्ण करणाऱ्या व्यक्तींना यावेळी घरून मतदान करता येणार आहे. त्यासाठी या व्यक्तींना फॉर्म 12 डी भरावा लागेल. तो भरून तुम्हाला इतर दस्तावेजांसोबत रिटर्निंग ऑफिसरकडं नेऊन द्यावा लागतो. त्यानंतर मतदानाच्या दिवसापूर्वी निर्धारीत वेळी मतदान केंद्राचे अधिकारी या व्यक्तींच्या घरी जातील आणि पोस्टल बॅलट भरून घेतील.

हे वाचलंत का :

  1. औरंगजेब आणि मोदी दोघेही एकाच मातीतले; खासदार संजय राऊत यांची टीका - Lok Sabha Election 2024
  2. पर्यावरण रक्षणासाठी लोकसभा निवडणूक लढणारा कोल्हापूरचा अवलिया संदीप संकपाळ, सायकलवरून येत दाखल केला अर्ज - Lok Sabha Election 2024
  3. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी पोलिंग पार्टी रवाना, प्रशासनाची तयारी पूर्ण; नागपूर, रामटेकमध्ये 124 संवेदनशील मतदान केंद्रे - Lok Sabha Election 2024

Last Updated : May 12, 2024, 5:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.