नवी दिल्ली ED Arrests BRS MLC Kavita : दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयानं मोठी कारवाई करत भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के. कविता यांना हैदराबादमधून अटक केली आहे. ईडी आता के. कविता यांना चौकशीसाठी दिल्लीत आणत असल्याची माहिती आहे. के. कविता यांच्या हैदराबाद येथील घरावर शुक्रवारी ईडीनं छापा टाकला होता. त्यानंतर काही तासांनी त्यांना अटक करण्यात आली आहे. कविता यांनी ईडीच्या काही समन्सकडं दुर्लक्ष केलं होतं. यानंतर ईडीनं त्यांच्या घरावर छापा टाकला.
ईडीकडून यापूर्वीच चौकशी : के. कविता या तेलंगणातील विधान परिषदेच्या सदस्य आहेत. त्या BRS पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या आहेत. याप्रकरणी ईडीनं यापूर्वीच त्यांची चौकशी केली आहे. मात्र, यावर्षी किमान दोनदा समन्स बजावूनही त्या चौकशीसाठी हजर झाल्या नव्हत्या.
'आप' नेत्यांना 100 कोटी रुपयांची लाच : दिल्लीतील दारू धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी अमित अरोरा यानं चौकशीदरम्यान के. कविता यांचं नाव घेतलं होतं. ईडीनं आरोप केला आहे की 'साउथ ग्रुप' नावाच्या लिकर लॉबीनं आणखी एक आरोपी विजय नायर यांच्यामार्फत 'आप' नेत्यांना 100 कोटी रुपयांची लाच दिली होती.
दिल्लीतील मद्य धोरण रद्द : ईडीनं दावा केला होता की, के. कविता या मद्य व्यापाऱ्यांच्या लॉबीत 'साउथ ग्रुप'शी संबंधित आहेत. त्यांनी 2021-22 च्या दिल्ली उत्पादन शुल्क धोरणात मोठी भूमिका बजावण्याचा प्रयत्न केला होता, असं ईडीचं म्हणणं आहे. हे धोरण आता रद्द करण्यात आलं आहे. ईडीच्या या छाप्यापूर्वी कविता तपास यंत्रणेच्या अनेक समन्सवर हजर झाल्या नव्हत्या.
हे वाचलंत का :