ETV Bharat / bharat

या दिवशी जगभरात एक तास अंधार असेल, जाणून घ्या काय आहे 'अर्थ अवर' - Earth hour 2024

Earth Hour Day 2024: 'अर्थ अवर डे'निमित्त आज रात्री 8:30 ते 9:30 दरम्यान जगभरात एक तास अंधार असेल. आता अंधारामागील कारण काय, हे जाणून घेण्यासाठी बातमी वाचा.

Earth Hour Day 2024
अर्थ अवर डे 2024
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 23, 2024, 11:55 AM IST

मुंबई- Earth Hour Day 2024: आज 23 मार्ज रोजी 'अर्थ अवर डे' जगात साजरा केला जात आहे. वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचरतर्फे दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी 'अर्थ अवर डे' साजरा केला जात असून या दिवशी जगभरातील कोट्यवधी लोक तासभर लाइटस् बंद करतात. जगातील निसर्ग आणि हवामान बदलाबाबत लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशानं दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. पृथ्वीवर विजेच्या अतिवापरामुळे प्रदूषण वाढत असल्यानं, या दिवसाचं विशेष महत्त्व आहे. 'अर्थ अवर डे' 2007 साली ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे सुरू झाला. हळूहळू जगभर हा दिवसा साजरा केला जाऊ लागला. अर्थ अवर सहसा रात्री 8:30 ते 9:30 दरम्यानचा असतो.

अर्थ अवर डे : 2008 मध्ये 35 देशांनी दरवर्षी 23 मार्च रोजी 'अर्थ अवर डे' साजरा करण्याचा निर्णय घेतला. आता 178 देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो. काही लोक मेणबत्त्या पेटवून 'अर्थ अवर डे' साजरा करतात. 'अर्थ अवर डे' साजरा करण्यामागील मुख्य कारण म्हणजे ऊर्जेचा वापर कमी करणे आणि निसर्गाचे संरक्षण आणि हवामान बदल यावर लक्ष केंद्रित करणे आहे. तसेच निसर्गाची हानी थांबवणे आणि पुढील येणाऱ्या पिढीचं भविष्य सुधारणे हा यामागचा उद्देश आहे. 'अर्थ अवर' मोहिमेला 190 हून अधिक देशांकडून पाठिंबा मिळत आहे. या जागतिक कार्यक्रमात दरवर्षी जगभरातून कोट्यवधी लोक सहभागी होतात.

पृथ्वीवरचं प्रदूषण : वीज बंद केल्यानं कार्बन फूटप्रिंट कमी होण्यास मदत होते. यामुळे ऊर्जाही वाचते. देशभरातील अनेक शहरांमध्ये सरकारी, निमसरकारी संस्था, शैक्षणिक संस्था आणि व्यावसायिक संस्था 'अर्थ अवर'मध्ये सहभागी होतात. या अंतर्गत प्रत्येकजण आपापल्या परिसरातील वीज एक तास बंद ठेवून हा दिवस साजरा करतात. पृथ्वीवर प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत चालली आहे. त्यावर आता काही ठोस पाऊल उचलण्याची गरज आहे. 'अर्थ अवर 2024' ची थीम 'युनायटेड फॉर अवर कॉमन होम' आहे. दरवर्षी आयोजक जागरुकता वाढवण्यास मदत करु शकणारी थीम ठरवतात आणि जागतिक स्तरावर हवामान बदलावर संभाषणांना प्रोत्साहन देतात. मार्च 2009 मध्ये, लाखो लोक तिसऱ्या 'अर्थ अवर'मध्ये सहभागी झाले होते. डब्लूडब्लूएफ ( WWF), जे वार्षिक अर्थ अवर कार्यक्रम आयोजित करते, त्याचे उद्दिष्ट पृथ्वीच्या नैसर्गिक पर्यावरणाचा ऱ्हास रोखणे आहे. ही संस्था जगभरातील 40 हून अधिक देशांमध्ये 90 हून अधिक कार्यालयांच्या नेटवर्कद्वारे कार्य करते. त्याचं पहिले कार्यालय 11 सप्टेंबर 1961 रोजी मॉर्गेस, स्वित्झर्लंडमध्ये स्थापन करण्यात आलं होतं.

हेही वाचा :

  1. दिल्ली विद्यापीठाच्या तळघरात भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव होते कैद, इथं आजही गर्जतो 'इन्कलाब झिंदाबाद'चा नारा - Shaheed diwas 2024
  2. World Forest Day 2024: जागतिक वनदिन, काय आहे महत्त्व आणि इतिहास
  3. World Sparrow Day 2024 : प्रदूषणामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर असलेली चिमणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.