मुंबई/पुणे Kolkata Doctor Rape Murder Case : कोलकाता इथल्या आर जी कार वैद्याकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील पदव्युत्तर विभागातील डॉक्टरवर अत्याचार करुन त्यांचा खून करण्यात आल्यानं देशभर संताप उफाळला आहे. या पीडितेला न्याय मिळण्यासाठी आज डॉक्टरांच्या विविध संघटनांनी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. त्यामुळे फक्त अत्यावश्यक सेवा वगळता सगळ्या रुग्णालयात संप पुकारण्यात आल्याची माहिती मार्डचे सरचिटणीस डॉ अक्षय डोंगरदिवे यांनी वृत्तसंस्थेला बोलताना दिली. सकाळी 9 वाजातापासून हा संप पुकारण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
ससून रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचं आंदोलन : कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन पुकारलं. राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांचा संप असून, पुण्यातील ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी देखील संप पुकारला. आज ससून रुग्णालयात या निवासी डॉक्टरांकडून आंदोलन करण्यात आलं.
बंगालमध्ये डॉक्टर तरुणीवर अत्याचार करुन खून : कोलकाता इथल्या आर जी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील सेमिनार हॉलमध्ये एका डॉक्टर तरुणीचा खून करण्यात आला. महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये ही डॉक्टर तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळून आली. विशेष म्हणजे या डॉक्टर तरुणीच्या अंगावर विविध जखमा आढळून आल्या. त्यासह पीडितेच्या अंगावर अर्धवट कपडे आढळून आल्यानं तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची चर्चा आहे. डॉक्टर तरुणीचा मृतदेह आढळून आल्यानं आर जी कार वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संदीप घोष यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र डॉक्टर तरुणीचा मृतदेह आढळून आल्यानं देशभर संतापाची लाट निर्माण झाली आहे.
#WATCH | Mumbai: On the incident at Kolkata's RG Kar Medical College and Hospital, BMC MARD General Secretary Dr Akshay Dongardive says, " ...the culprits of the incident should be punished, our national campaign has started for this. this campaign is going on in all the states.… pic.twitter.com/pbyLBFtRyR
— ANI (@ANI) August 12, 2024
मार्ड डॉक्टरांनी दिली बंदची हाक : कोलकाता इथल्या आर जी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एका 31 वर्षीय डॉक्टर तरुणीचा मृतदेह आढळून आल्यानं मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी मार्ड संघटनेनं आज राज्यभर बंदची हाक दिली आहे. मार्डचे सरचिटणीस डॉ अक्षय डोंगरदिवे यांनी याबाबत वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे. "कोलकाता इथल्या आर जी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील डॉक्टर तरुणीवर झालेल्या अत्याचार आणि खून प्रकरणातील पीडितेला न्याय मिळावा. या घटनेतील दोषींना शिक्षा झाली पाहिजे, यासाठी आमची राष्ट्रीय पातळीवर मोहीम सुरू झाली आहे. आज देशभरात सकाळी 9 वाजतापासून डॉक्टरांच्या विविध संघटनांनी संप पुकारला आहे. महाराष्ट्रातील सर्व डॉक्टर सकाळी 9 वाजतापासून संपावर जाणार आहेत. त्यामुळे राज्यभरातील ओपीडी बंद राहणार आहेत. या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी कराण्यात येऊन पीडितेला न्याय देण्यात यावा," अशी आमची मागणी आहे, असं त्यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं.
The Federation of All India Medical Association (FAIMA) calls for a nationwide shutdown of OPD services from August 13, as a protest against the sexual assault and murder of a woman post-graduate trainee (PGT) doctor at Kolkata's RG Kar Medical College and Hospital, on August 9. pic.twitter.com/kfJBY3Rkn3
— ANI (@ANI) August 12, 2024
डॉक्टरांचा आज देशव्यापी संप : कोलकाता इथल्या डॉक्टर तरुणीवर झालेल्या अत्याचार आणि खून प्रकरणामुळे डॉक्टरांच्या संघटनांनी देशव्यापी संप पुकारला आहे. डॉक्टरांच्या The Federation of All India Medical Association (FAIMA) या संघटनेनं देशव्यापी बंदची हाक दिली आहे. या घटनेतील पीडितेला न्याय देण्यात यावा, यासाठी राज्यातील डॉक्टरही आज संपावर जाणार आहेत. त्यामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा :