जयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी अखेर जेरंबद झाला. या आरोपीला राजस्थानमध्ये ताब्यात घेण्यात आलं आहे. आरोपीनं पंतप्रधान मोदींना मारण्याची धमकी देणारा व्हॉट्सअप मुंबई पोलिसांना केल्यानंतर आरोपीला ताब्यात घेण्याचं मोठे आव्हान होते.
मुंबई पोलिसांना धमकीचा संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीला अजमेर पोलीस आणि एटीएसच्या विशेष पथकानं अजमेर रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले. आरोपनं महाराष्ट्रातील गोवंडी पोलीस स्टेशनच्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज पाठवला होता. त्यामध्ये म्हटलं की, " कंपनीचा व्यवस्थापक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचा आणि झारखंडच्या धनबादमध्ये ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा कट रचत आहे. हा व्हॉट्सअप केल्यानंतर आरोपी फरार झाला. अतिमहत्त्वाच्या व्यक्तीला धमकी मिळाल्यानं मुंबई पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. व्हॉट्सअप लोकेशनवरून एटीएस आणि अजमेर पोलिसांच्या विशेष पथकानं त्याला अजमेरमध्ये ताब्यात घेतलं.
आरोपीनं व्हॉट्सअपमध्ये मेसेजमध्ये काय म्हटले?अजमेर एटीएसचे प्रभारी नरेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले की, मोहम्मद मिर्झा बेगनं महाराष्ट्रातील गोवंडी पोलिस स्टेशनच्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज केला. कंपनीचा मॅनेजर शस्त्रास्त्र कारखाना चालवतो, असा त्यानं दावा केला. कंपनीचा मॅनेजर ट्रेनमध्ये स्फोट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारण्याची योजना आखत असल्याचा त्यानं दावा केला. त्यानंतर मुंबई पोलिसांना सतर्क करण्यात आले. आरोपीनं व्हॉट्सअपवरून मेसेज पाठवला. त्याचं लोकेशन पोलिसांकडून सातत्यानं ट्रेस केलं जात होते.
व्यवस्थापकाला अडकविण्याचा प्रयत्न?मुंबई पोलिसांना आरोपीचे अजमेर येथील लोकेशन सापडले. मुंबई पोलिसांनी तातडीनं अजमेर पोलिसांना याबाबत माहिती दिली. मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी मोहम्मद मिर्झा बॅग याला रेल्वे स्थानकावरून पकडण्यात आलं. गुजरातमधील पालनपूर येथे एक कंपनी आहे. तिथे आरोपी काम करतो. व्यवस्थापकाशी भांडण झाल्यानंतर आरोपीनं महाराष्ट्रातील गोवंडी पोलीस ठाण्याच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर धमकीचा संदेश पाठवला. त्यामागे व्यवस्थापकाला अडचणीत आणण्याचा आरोपीचा हेतू होता, असा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी थेट आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढल्यानं त्याचे बिंग फुटले.
मुंबई पोलीस करणार तपास- मुंबई पोलिसांना आरोपीच्या अटकेची माहिती देण्यात आली आहे. आरोपीची सखोल चौकशी करण्यात येत आहे. अजमेरमध्ये तो कुठे आणि कोणाला भेटला? याचाही शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय महाराष्ट्रातील गोवंडी पोलीस ठाण्यात व्हॉट्सअप करण्याचा काय हेतू होता? याचा तपास करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा मुंबई पोलीस तपास करणार आहेत.
हेही वाचा-