भुवनेश्वर : ओडिशा राज्यात दाना चक्रीवादळानं मोठा धुमाकूळ घातला आहे. दाना चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मात्र आज पहाटे 1.30 ते 3.30 वाजताच्या दरम्यान दाना चक्रीवादळानं हबलीखाटी निसर्ग शिबीर आणि धमाराजवळील उत्तर ओडिशाच्या किनारपट्टीला 100 ते 110 प्रतितास वाऱ्याच्या वेगानं ओलांडलं आहे. दाना चक्रीवादळाचा वेग आता पुढं 120 प्रतितास झाला असून ते पुढं सरकत आहे.
दाना चक्रीवादळाचा ओडिशात हाहाकार सुरूच : दाना चक्रीवादळाचा ओडिशाच्या उत्तर किनारपट्टीवर मोठा धुमाकूळ सुरू आहे. दाना चक्रीवादळानं हबलाती निसर्ग शिबिराजवळून पुढं वाटचाल सुरू केली आहे. सध्या दाना चक्रीवादळाचा वेग प्रतितास 120 च्या दरम्यान आहे. बंगालच्या वायव्य उपसागरावर तीव्र झालेलं दाना चक्रीवादळ ओडिशाच्या दिशेनं पुढं सरकत आहे. दाना चक्रीवादळानं उत्तर-वायव्य दिशेनं वाटचाल केली. दाना चक्रीवादळाच्या वायव्य दिशेला बंगालचा उपसागर अक्षांश 20.60 अंश उत्तर आणि रेखांश 87.00 अंशाजवळ हबलीखाती निसर्ग शिबिराजवळून हे वादळ पुढं सरकत आहे, असं हवामान विभागाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या बुलेटीनमध्ये नमूद करण्यात आलं आहे. दाना चक्रीवादळामुळे ओडिशात मोठी पडझड सुरू आहे. अनेक ठिकाणी मोठी झाडं उन्मळून पडली आहेत.
पडझडीमुळे नागरिकांना हलवलं छावणीत : दाना चक्रीवादळामुळे प्रशासनानं नागरिकांना सुरक्षीत छावणीत हलवलं आहे. दाना चक्रीवादळानं किनारपट्टी परिसरात मोठा धुमाकूळ घातला आहे. वेगानं वारे वाहत असल्यानं नागरिकांना बाहेर निघण्यास मज्जाव करण्यात आला आहे. सध्या दाना चक्रीवादळाचा मोठा फटका किनारी परिसराला बसला आहे. किनारपट्टीवरील परिसरात मोठमोठी झाडं उन्मळून पडली आहेत. तर अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं हाहाकार उडाला आहे.
#WATCH | Odisha: Gusty winds and heavy downpour cause destruction in Dhamra, Bhadrak
— ANI (@ANI) October 25, 2024
The landfall process of #CycloneDana underway pic.twitter.com/1tILknoZyK
The severe cyclonic storm 'Dana' moved north-northwestwards with a speed of 10 kmph and lay centred at 0530 hrs IST of today, the 25th October, over north coastal Odisha near latitude 21.00° n and longitude 86.85°e, about 20 km north-northwest of dhamara and 40 km north-northwest… pic.twitter.com/YWSVdHQm9F
— ANI (@ANI) October 25, 2024
हेही वाचा :