ETV Bharat / bharat

केरळचे माजी मुख्यमंत्री करुणाकरन यांच्या कन्या भाजपात करणार प्रवेश, काय आहेत कारणे?

Padmaja Venugopal joins BJP : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केरळचे माजी मुख्यमंत्री के. करुणाकरन यांची कन्या पद्मजा वेणुगोपाल या भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यांना भाजपाकडून लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

Padmaja Venugopal joins BJP
Padmaja Venugopal joins BJP
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 7, 2024, 10:24 AM IST

Updated : Mar 7, 2024, 11:19 AM IST

कोची Padmaja Venugopal joins BJP : काँग्रेस नेत्या पद्मजा वेणुगोपाल लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रानं माहिती दिली आहे. पद्मजा वेणुगोपाल या वडाकाराचे खासदार के. मुरलीधरन यांच्या बहीण आहेत.

दिल्लीत असलेल्या पद्मजा वेणुगोपाल आज भाजपा मुख्यालयात पक्षाचं सदस्यत्व स्वीकारणार आहेत. पद्मजा यांनी सुरुवातीला भाजपाशी जवळीक होत नसल्याची प्रतिक्रिया दिली होती. पण पद्मजा यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी भेट घेतल्याच्या वृत्ताला सूत्रांनी दुजोरा दिला. आज त्या भाजपा मुख्यालयात औपचारिकपणे पक्षाचं सदस्यत्व स्वीकारणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत पद्मजा यांना केरळमधून भाजपाचं तिकीट दिलं जाईल, अशी चिन्हे दिसत आहेत. एर्नाकुलम किंवा चालकुडी मतदार संघातून भाजपा पद्मजा वेणुगोपाल यांना तिकीट देण्याची शक्यता आहे.

पद्मजा यांनी काँग्रेस सोडण्यामागं काय असू शकतात कारणे : पद्मजा यापूर्वी केरळ काँग्रेस प्रदेश कमिटीच्या अध्यक्षा होत्या. काँग्रेस हायकंमाडचं त्यांच्याकडं सतत दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे. त्यांनी काँग्रेस सोडण्याचे संकेत अगोदरच दिले होते. पद्मजा यांना केरळमधून राज्यसभेची जागा दिली जाईल, अशी अपेक्षा त्यांच्या जवळच्या सूत्रांनी व्यक्त केली होती. परंतु काँग्रेस नेतृत्वानं पुढील रिक्त राज्यसभेची जागा आययूएमएलला देऊ केल्यावर पद्मजा यांनी नाराजी व्यक्त केली होती. गेल्या अनेक दिवसांपासून पद्मजा भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पद्मजा यांनी काँग्रेससोबत तीव्र मतभेद असल्याचं जाहीर केलं होतं. पद्मजा यांनी 2000 मध्ये मुकुंदापुरममधून लोकसभा निवडणूक लढवली होती. 2021 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर त्रिशूरमधून विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना दोन्ही निवडणूका जिकंण्यात अपयश आलं होतं.

अनिल अँटोनी यांचा गतवर्षी भाजपात प्रवेश : काँग्रेसचे दिग्गज नेते ए. के. अँटनी यांचा मुलगा अनिल अँटोनी यांनी गेल्या वर्षी भाजपात प्रवेश केला होता. वर्षभरापूर्वी भाजपामध्ये दाखल झालेले अनिल अँटोनी यांना भाजपानं उमेदवारी दिली होती. त्यांना भाजपानं त्यावेळी राष्ट्रीय प्रवक्तेपद दिलं होतं. अनिल अँटोनी यांनी भाजपाच्या तिकीटावर केरळमधील बहुप्रतिक्षित पठाणमथिट्टा मतदारसंघातूनही निवडणूक लढवली आहे. त्यानंतर भाजपानं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. करुणाकरन यांची मुलगी पद्मजा वेणुगोपाल यांना भाजपात प्रवेश देण्याची तयारी सुरू केल्याचं सूत्रांनी सांगितलंय. अलीकडेच केरळ काँग्रेसचे माजी नेते पीसी जॉर्जसह त्यांचा मुलगा शॉन जॉर्ज यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. मात्र, पद्मजा वेणुगोपाल यांच्या भाजपा प्रवेशानं काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसमध्ये सातत्यानं होणाऱ्या उपेक्षेमुळं पद्मजा यांनी पक्ष सोडल्याचं बोललं जात आहे.

हे वाचलंत का :

  1. "...त्यांचं अंतर्मन पूर्ण भाजपाचंच", नवनीत राणांच्या पक्ष प्रवेशावरून बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?
  2. नांदेडमध्ये काँग्रेसला धक्का : अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात 55 माजी नगरसेवकांचा भाजपामध्ये प्रवेश
  3. विरोधी पक्षातील नेत्यांचे भाजपात प्रवेश होताना नवनीत राणांना पक्षप्रवेश का नाही? खासदार अनिल बोंडे यांनी स्पष्टचं सांगितलं

Last Updated : Mar 7, 2024, 11:19 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.