भोपाळ- चित्रकूट जिल्ह्यातील रायपुरा भागात राष्ट्रीय महामार्ग-35 वर शुक्रवारी (आज) सकाळी भीषण अपघात झाला. ट्रक आणि बोलेरो यांच्यात झालेल्या भीषण धडकेत सहा जणांचा मृत्यू झाला. तर 5 जण जखमी झाले आहेत.
मध्य प्रदेशातील छपरपूर येथील रहिवासी असलेले हे कुटुंब प्रयागराजहून परतत असताना भीषण अपघात झाला. चालकाला अचानक झोप आल्यानं हा अपघात झाल्याचं माहिती सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील गुलगंज, छतरपूर येथील रहिवासी जमुना अहिरवार यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ते अस्थिकलशाचे विसर्जन करण्यासाठी पत्नी, मुले आणि नातेवाईकांसह कुटुंबातील एकूण 11 जणांसह प्रयागराज येथे गेले होते.
जखमींवर उपचार सुरू-गुरुवारी रात्री उशिरा सर्वजण बोलेरोमधून प्रयागराजहून घरी परतत होते. शुक्रवारी पहाटे 5.30 च्या सुमारास चित्रकूटच्या रायपुरा भागातून जात असताना चालकाला अचानक झोप लागली. यानंतर बोलेरो रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर दरम्यान समोरून एक ट्रक आला. यावेळी बोलेरोची थेट ट्रकला धडक बसली. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. इतर 5 जखमींवर उपचार सुरू आहेत.
वाहनावर नियंत्रण सुटल्यानं अपघात- माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक अरुण कुमार सिंहही घटनास्थळी पोहोचले. जिल्हा पोलीस अधीक्षक अरुण कुमार म्हणाले," प्रयागराजहून छतरपूरला जाणाऱ्या बोलेरोच्या चालकाला अचानक पहाटे झोप लागली. त्यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यावेळी समोरून येणाऱ्या ट्रकला बोलेरो धडकली. यामध्ये 11 पैकी 6 जणांचा मृत्यू झाला. पाच जण गंभीर जखमी आहेत. जखमीला प्रयागराज येथे पाठविण्यात आले आहे".