ETV Bharat / bharat

ब्रिटीश उच्चायुक्त लिन्डी कॅमेरॉन यांनी घेतली योगी आदित्यनाथांची भेट; उत्तरप्रदेशात करणार गुंतवणूक - Lindy Cameron meets Yogi Adityanath

Lindy Cameron meets Yogi Adityanath : ब्रिटीश उच्चायुक्त लिंडी लिंडी कॅमेरॉन यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट गेतली. यावेळी त्यांनी उत्तरप्रदेशात गुंतवणूक करण्यासाठी संधी असल्याचं स्पष्ट केलं.

Lindy Cameron meets Yogi Adityanath
ब्रिटीश उच्चायुक्त लिन्डी कॅमेरॉन आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 9, 2024, 1:51 PM IST

लखनऊ Lindy Cameron meets Yogi Adityanath : ब्रिटिश उच्चायुक्त लिंडी कॅमेरॉन यांनी गुरुवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ब्रिटन आणि भारत यांच्यातील मैत्री पुढं नेल्याबद्दल उच्चायुक्त लिन्डी कॅमेरॉन यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले. योगी आदित्यनाथ यांच्यासोबतच्या या बैठकीचं वर्णन करताना उच्चायुक्त लिन्डी कॅमेरॉन यांनी लिहिलं आहे की, "त्यांनी उत्तरप्रदेशातील उच्च शिक्षण, व्यवसाय, इलेक्ट्रिक वाहनं आणि इतर व्यवसायातील संधीबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी सविस्तर चर्चा केली." मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ब्रिटनच्या उच्चायुक्तांसोबतच्या भेटीचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला.

उच्चायुक्त लिंडी कॅमेरॉन आणि योगी आदित्यनाथ यांची भेट : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ब्रिटीश उच्चायुक्त लिंडी कॅमरॉन यांच्यासोबत भेट घेतली आहे. त्यांच्या भेटीचा फोटो योगी आदित्यनाथ यांनी आपल्या सोशल माध्यमात शेयर केला. यावेळी त्यांनी "आज ब्रिटिश उच्चायुक्त लिंडी कॅमेरॉन यांच्याशी लखनऊमधील निवासस्थानी भेट घेतली." सीएम योगींच्या या पोस्टला उत्तर देताना, ब्रिटीश उच्चायुक्त लिंडी कॅमेरॉन यांनी लिहिलं, "मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पहिल्या भेटीदरम्यान मौल्यवान माहितीचं आदान प्रदान झालं. भारत आणि ब्रिटनमधील मैत्री पुढं नेल्याबद्दल धन्यवाद, आपण उच्च शिक्षण, व्यवसायाच्या संधी, इलेक्ट्रिक वाहनं आणि व्यवसायात खूप मैत्री पुढे नेणार आहोत."

उत्तरप्रदेशात यूकेच्या गुंतवणूकदारांना दिली संधी : ऑक्सफर्ड विद्यापीठामधून पदवीधर आणि यूके नॅशनल सायबर सिक्युरिटी सेंटरच्या माजी सीईओ लिंडी कॅमेरॉन यांची यावर्षी भारतातील यूके उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्या भारतातील पहिल्या महिला ब्रिटिश उच्चायुक्त देखील आहेत. उत्तर प्रदेशात ब्रिटिश गुंतवणूकदारांना चामडे आणि कापड, आरोग्यसेवा, सौर ऊर्जा, अन्न प्रक्रिया यासारख्या क्षेत्रात अनेक संधी देते. अनेक कंपन्यांनी उत्तर प्रदेश हे त्यांचे भारतातील गुंतवणुकीचे ठिकाण म्हणून आधीच निवडलं आहे.

हेही वाचा :

  1. "मोदींना सत्तेत येण्यापासून रोखण्याची कुणाचीही हिंमत नाही, निवडणुकीनंतर काँग्रेससह इंडिया आघाडीचं..."- योगी आदित्यनाथ - Lok Sabha Election 2024
  2. काँग्रेसला मत म्हणजे पाकिस्तानला मत, त्यामुळे काँग्रेसला पाडा - योगी आदित्यनाथ - Yogi Adityanath In Malegaon
  3. मोहन भागवत-योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा, लोकसभेतील खराब कामगिरीनंतर काय होणार बदल? - Yogi Adityanath meet Mohan Bhagwat

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.