ETV Bharat / bharat

रेल्वेनं चालवली 'हत्या-एर्नाकुलम एक्सप्रेस', फोटो व्हायरल झाल्यानंतर गुगलवर फोडलं खापर - Hatia Ernakulam Express - HATIA ERNAKULAM EXPRESS

Hatia Ernakulam Express : रांचीच्या हटियाहून केरळच्या एर्नाकुलमला जाणारी एर्नाकुलम एक्सप्रेस चुकीमुळं सोशल मीडियावर व्हायरल झाली. ट्रेनच्या नेम प्लेटवर मल्याळममधील हटियाचं स्पेलिंग चुकलं. हातियाच्या जागी मल्याळममध्ये लिहिलेल्या शब्दाचा अर्थ हत्या असा होतो. मात्र, ही बाब रेल्वे अधिकाऱ्यांना समजताच त्यांनी तात्काळ बदल केला.

Hatia Ernakulam Express
गुगल ट्रान्सलेटरच्या भरोसे भारतीय रेल्वे! गुगलची मदत घेतली अन् रेल्वेनं चालवली 'हत्या-एर्नाकुलम एक्सप्रेस'
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 14, 2024, 1:07 PM IST

रांची Hatia Ernakulam Express : झारखंडची राजधानी रांचीच्या हटिया रेल्वे स्थानकापासून सुरु होणाऱ्या हटिया-एर्नाकुलम एक्स्प्रेसचा बोर्ड मल्याळममध्ये चुकून हत्या-एर्नाकुलम एक्सप्रेस असं लिहिल्यानं सोशल मीडियात व्हायरल झाला होता. यामुळं रेल्वे प्रशासनावर सोशल मीडियातून टीकाही होत आहे.

नेमकं काय आहे प्रकरण : रांची (हटिया) ते एर्नाकुलम धावणाऱ्या ट्रेनच्या नेम प्लेटवर तीन भाषांमध्ये हटिया एक्सप्रेस असं नाव लिहिलेलं होतं. हटिया इंग्रजी, हिंदी आणि मल्याळम भाषेत लिहिलेलं होतं. हिंदी आणि इंग्रजीमध्ये लिहिलेलं हटिया एक्सप्रेस बरोबर होतं. परंतु मल्याळममध्ये लिहिलेला हटिया हा शब्द चुकीचा लिहिला गेला. मल्याळममध्ये लिहिलेल्या हटिया शब्दाचा अर्थ म्हणजे हिंदीत हत्या होतो. रेल्वेनं भाषांतर केल्यानंतर, मल्याळममध्ये लिहिलेला शब्द 'कोलापथकम' आहे. त्याला हिंदीत हत्या म्हणतात. या बिघाडामुळं अनेक दिवस हटिया एर्नाकुलम एक्स्प्रेस रांची ते एर्नाकुलम धावत होती. पण त्याच दरम्यान एका प्रवाशानं नेम प्लेट पाहिली. त्या फोटो काढून सोशल मीडियालर पोस्ट केली. ही पोस्ट व्हायरल झाली.

गुगल ट्रान्सलेटरची मदत : व्हायरल झाल्यानंतर रेल्वं प्रशासनानं तात्काळ दखल घेतली. रेल्वेच्या या चुकीबाबत हटिया विभागाचे डीसीएम निशांत कुमार यांनी सांगतलं की, "नेम प्लेटचं भाषांतर करताना गुगलची मदत घेण्यात आली होती. गुगलमध्ये जो काही शब्द दिसला, तो नेम प्लेटवर टाकून कर्मचाऱ्यांनी बोर्ड बसविला. ईशान्य भारतातील बहुतांश लोकांना मल्याळम भाषा येत नाही. त्यामुळं कोणी लक्ष दिलं नाही. रांची ते एर्नाकुलम अशी ट्रेन बरेच दिवस त्याच नावानं धावत राहिली." मात्र ही चूक सोशल मीडियाच्या माध्यमातून उघडकीस येताच हटिया रेल्वे विभागानं तत्काळ त्या प्रकारातील सर्व फलक बदलून ती दुरुस्त केली. जेव्हा ईटीव्ही भारत टीमनं वरिष्ठ डीसीएम निशांत कुमार यांना विचारलं की, नेम प्लेट्सवर नावं लिहिल्यावर भाषांतरकारांकडून नावं तपासली जात नाहीत का? तेव्हा त्यांनी प्रत्येक ठिकाणी अनुवादक उपलब्ध नसल्याचं सांगितलं. त्यामुळे अनेक वेळा लोक गुगल किंवा इतर साइट्सच्या माध्यमातून काम करतात, असं त्यांनी उत्तर दिलं.

अशी चुक होऊ नये म्हणून ठोस पावलं उचलणार : रेल्वे विभागाचे अधिकारी वरिष्ठ डीसीएम निशांत कुमार म्हणाले की, "भविष्यात अशी चूक होऊ नये. याबाबत विशेष काळजी कशी घ्यावी. याबाबत निश्चितपणे ठोस पावलं उचलली जातील." हटिया स्टेशनवरील ट्रेनचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. तेव्हा अनेक लोक मजेशीर पद्धतीनं पोस्ट करताना दिसले. काहीजण याला साधी चूक म्हणत आहेत. तर काहीजण याला रेल्वेचा निष्काळजीपणा म्हणत आहेत. हटिया ते केरळला जाणारी हटिया-एर्नाकुलम एक्स्प्रेस आठवड्यातून दोन दिवस धावते. यात हजारो लोक प्रवास करतात.

हेही वाचा :

  1. 'सुपरमॅन' बनायला गेला अन् कारागृहात पोहोचला! ट्रेनमध्ये सीट न मिळाल्यानं पठ्ठ्यानं छतावर झोपून केला 400 किमी प्रवास - Humsafar Express
  2. कहरच! चक्क ड्रायव्हरविना धावली रेल्वे गाडी, कठुआ रेल्वे स्थानकातील प्रकार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.