बंगळुरू : कर्नाटकच्या महिला मंत्र्यांवर भाजपा आमदारांनी अश्लील टिप्पणी केल्याचा आरोप करण्यात आल्यानं मोठा वाद निर्माण झाला. या प्रकरणी भाजपा आमदार तथा माजी राष्ट्रीय सरचिटणीस सी टी रवी यांना गुरुवारी अटक करण्यात आली. हिरेबागेवाडी पोलिसांनी सी टी रवी यांना बेळगाव येथील सुवर्ण विधान सौध येथून अटक करून नंतर पोलीस ठाण्यात नेलं. कर्नाटकच्या महिला मंत्र्यांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर तासाभरात सी टी रवी यांना अटक करण्यात आली. भाजपा आमदाराला अटक केल्यानंतर मात्र कर्नाटकमधील राजकारण चांगलंच तापलं आहे.
#WATCH | FIR filed against BJP leader CT Ravi on the complaint by Karnataka minister Lakshmi Hebbalkar. She alleged that he used derogatory words against her in the Legislative Council on 19th December.
— ANI (@ANI) December 20, 2024
State BJP chief Vijayendra Yediyurappa says, " speaker has already given the… pic.twitter.com/N9HByqt3ug
कर्नाटकच्या महिला मंत्र्यांवर भाजपा आमदारांची अश्लील टिप्पणी : कर्नाटकच्या महिला मंत्र्यांवर भाजपा आमदार सी टी रवी यांनी अश्लील टिप्पणी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. सी टी रवी यांच्यावर आरोप करण्यात आल्यानंतर कर्नाटकचं राजकारण चांगलंच तापलं. महिला मंत्र्यांनी सी टी रवी यांच्यावर आरोप करत त्यांच्याविरोधात हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरुन सी टी रवी यांच्यावर भारतीय न्याय संहिता कायद्याच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यात कलम 75 (लैंगिकदृष्ट्या अयोग्य टिप्पणी केल्याबद्दल) आणि 79 (महिलांच्या विनयशीलतेचा अपमान करण्यासाठी शब्द वापरल्याबद्दल) अंतर्गत आरोप करण्यात आले आहेत. आरोप सिद्ध झाल्यास आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते.
भाजपा कार्यकर्ते आक्रमक : महिला मंत्र्यांनी आरोप करत सी टी रवी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यामुळे सी टी रवी यांना तत्काळ अटक करण्यात आली. मात्र सी टी रवी यांना अटक केल्यानंतर भाजपा कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. भाजपा आमदारांनी सुवर्णा सौधासमोर निदर्शनं केली. अगोदरच्या दिवशी सी टी रवी यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सी टी रवी यांच्या वतीनं तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपा नेत्यांनी या महिला मंत्र्यांसह त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा :
- कर्नाटकात पाच वर्षात तब्बल 3 हजार 364 माता मृत्यू; गरोदर महिलांमध्ये दहशत
- सिद्धरामय्या यांच्यावर खटला चालवण्यास राज्यपालांनी मंजुरी दिल्यानं काँग्रेस आक्रमक, राज्यव्यापी आंदोलन करणार - Karnataka MUDA Case
- कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची जमीन घोटाळ्याच्या प्रकरणात होणार चौकशी, उच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब! - MUDA Case