ETV Bharat / bharat

उत्तराखंडमधील नानकमट्टाच गुरुद्वारा प्रमुखाची हत्या; तीन महिन्यांत दोन धर्मगुरूची हत्या - Baba Tarsem Singh Murder - BABA TARSEM SINGH MURDER

Baba Tarsem Singh Murder : उत्तराखंडमधील उधमसिंग नगर येथील नानकमत्ता गुरुद्वाराच्या प्रमुखाची गुरुवारी सकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीय. 3 सेकंदात हत्या करून दोघे हल्लेखोर दुचाकीवरुन पसार झाले. आश्चर्याची बाब म्हणजे राज्यात लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडत असताना हत्याकांड घडलं आहे.

Baba Tarsem Singh Murder
Baba Tarsem Singh Murder
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 28, 2024, 5:36 PM IST

Updated : Mar 28, 2024, 7:10 PM IST

संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

उधमसिंग नगर Baba Tarsem Singh Murder : उत्तराखंडमधील उधम सिंग नगर येथे नानकमत्ता गुरुद्वाराचे डेरा कारसेवा प्रमुख बाबा तरसेम सिंग यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येमुळं पंजाबमध्ये शोकाकुल वातावरण आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सुमारे महिनाभरापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर हत्या होणार असल्याची भीती व्यक्त केली होती, मात्र तरीदेखील त्यांना सुरक्षा देण्यात आली नव्हती.

ज्ञात हल्लेखोरानं झाडल्या गोळ्या : मिळालेल्या माहितीनुसार, कार सेवा डेरा प्रमुख नानकमत्ता बाबा तरसेम सिंग (60) यांच्यावर मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरानं गोळ्या झाडल्या. त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत तरसेम सिंग यांना उपचारासाठी खातिमा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जिथं त्यांचा मृत्यू झाला. हत्येच्या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. तसंच हल्लेखोराच्या शोधासाठी पथके तैनात करण्यात आलीत.

घटनेचा तपास सुरू : मिळालेल्या माहितीनुसार, नानकमट्टा येथे डेरा प्रमुख तरसेम सिंग यांच्यावर तीन सेकंदात हल्लेखोरांनी दोनवेळा गोळ्या झाडल्या. हल्लेखोर सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहेत. एसएसपी मंजुनाथ टीसी यांनी सांगितलं की, घटनेचा तपास सुरू आहे. दुचाकीवर मागे बसलेल्या हल्लेखोरानं दोन गोळ्या झाडल्या. घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांचं पथक घटनास्थळी दाखल झालं आहे.

कडक कारवाईच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना : उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी नानकमत्ता गुरुद्वारा डेरा प्रमुख तरसेम सिंग यांच्या दुर्दैवी हत्येची दखल घेत कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. तसंच या घटनेच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याच्या सक्त सूचना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न : तरसेम सिंग यांच्या गोळीबारात मृत्यू झाल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते यशपाल आर्य यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केलाय. त्यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं की, भाजपाच्या राजवटीत धर्मगुरू देखील सुरक्षित नाहीत. ही केवळ बाबा तरसेमचीच नव्हे, तर कायदा आणि सुव्यवस्थेची हत्या आहे. भाजपा सरकारच्या काळात कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून गुन्हेगारांचा सुवर्णकाळ सुरू आहे.

हे वाचलंत का :

  1. चिमुरड्याचं अपहरण, खंडणी अन् निर्घृण हत्या; मोबाईल लोकेशनमुळं आरोपी सापडले, दोन भावांना अटक - Boy Killed For Ransom
  2. नाशिकमध्ये धुलिवंदानाच्या सणाला गालबोट; आईसमोर रेकॉर्डवरील गुन्हेगाराची धारदार शस्त्राने हत्या... - Nashik Muder News
  3. राजस्थानात रक्तरंजित 'होळी'; पोलिसात तक्रार देण्यासाठी जाणाऱ्या पाच जणांची डंपरनं चिरडून हत्या - Murder In Jhalawar

Last Updated : Mar 28, 2024, 7:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.