ETV Bharat / bharat

भाजपाबरोबर सत्ता स्थापन केल्यानंतर नितीश कुमारांना आरजेडीची भीती, विधानसभा अध्यक्षांना बजाविली 'ही' नोटीस

Awadh Bihari Choudhary: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आरजेडीची साथ सोडून ते भाजपासोबत गेले आहेत. त्यांनी रविवारी पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे पुन्हा बिहारमध्ये एनडीएचं सरकार स्थापन झालं आहे.

Awadh Bihari Choudhary
बिहार पॉलिटीक्स
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 29, 2024, 12:00 PM IST

पाटणा : जेडयू आणि आरजेडीचं सरकार जाऊन आता बिहारमध्ये पुन्हा एनडीएचं सरकार स्थापन झालं आहे. नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा बाजू बदलली आहे. ते आरजेडीची साथ सोडून भाजपसोबत गेले आहेत. यानंतर आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी 'खेला झाला नाही' 'खेला बाकी है' अशी प्रतिक्रिया दिल्याने चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. तेजस्वी यांच्या या दाव्यानंतर आता मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहार विधानसभेचे अध्यक्ष अवध बिहारी चौधरी यांना हटवण्याचे प्रयत्न सुरू केल्याचं बोललं जातय. त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याची तयारी सुरू झाली आहे.

बिहार विधानसभेचे अध्यक्ष अवध चौधरी यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस जारी करण्यात आली आहे. भाजपा आमदार नंदकिशोर यादव यांनी विधानसभा सचिवांना अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली आहे. त्यानंतर आता विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झाल्यावर त्यांना हटवण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

सभापतींवर विश्वास राहिलेला नाही : पाटणा साहिबमधील भारतीय जनता पक्षाचे आमदार नंदकिशोर यादव यांनी अवध बिहारी चौधरी यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावाची नोटीस बिहार विधानसभेच्या सचिवांना दिली आहे. त्यामध्ये 'नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर या सभागृहाचा विद्यमान सभापतींवर विश्वास राहिलेला नाही, असं या नोटीसीमध्ये नमूद करण्यात आलं आहे. या प्रस्तावावर जीतन राम मांझी, तारकिशोर प्रसाद आणि जेडीयूचे आमदार विनय कुमार चौधरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

क्रॉस व्होटिंग न झाल्यास धोका : सभापती अवध बिहारी चौधरी स्वतःहून पायउतार झाले नाहीत, तर त्यांना मतदानाद्वारे पदावरून हटवण्याची प्रक्रिया होणार आहे. सध्या 243 सदस्यीय विधानसभेत एनडीएचे 128 आमदार आहेत. तर, महाआघाडीकडे 114 आमदार आहेत. एआयएमआयएमचा एक आमदार आहे. अशा परिस्थितीत क्रॉस व्होटिंग न झाल्यास सभापतींची हकालपट्टी निश्चित आहे. मात्र, त्यांच्या बाजूने मते पडली तर नितीश सरकारकडे बहुमत नसल्याचंही स्पष्ट होईल.

बहुमत सिद्ध करणे कठीण होऊ शकते : अवध बिहारी चौधरी हे आरजेडीचे आमदार आहेत. त्यानंतर जेडयू आणि आरजेडी महाआघाडीचे सरकार स्थापन झालं त्यानंतर ते आरजेडीच्या कोट्यातून विधानसभेचे अध्यक्ष झाले. सध्या नवीन सरकारला बहुमत सिद्ध करणे कठीण होऊ शकते, अशी भावना मुख्यमंत्री नितीश कुमार आणि एनडीएची आहे. त्यामुळे त्यांना या पदावरून हटवण्याचं त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

हेही वाचा :

1 'भविष्यात जनताच त्यांना धडा शिकवेल'; शरद पवारांचा नितीश कुमारांवर हल्लाबोल

2 नितीश कुमारांनी नवव्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, राजभवनात 'जय श्री राम'च्या घोषणा

3 नितीश कुमार यांच्यासोबत 'या' आठ नेत्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ; जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.