ETV Bharat / bharat

घोडेबाजार टाळण्याकरिता काँग्रेसची तयारी, नितीश कुमारांच्या फ्लोअर टेस्टपूर्वी आमदारांना हैदराबादला हलवलं! - बिहारमधील कॉंग्रेस आमदार

Bihar Congress MLAs : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या फ्लोअर टेस्टपूर्वी बिहारमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेस पक्षातील आमदारांची कोणत्याही प्रकारची फोडाफोडी होण्याच्या शक्यतेपासून वाचवण्यासाठी काँग्रेसनं आपल्या आमदारांना हैदराबादला पाठवलं आहे.

Bihar Congress MLAs
बिहारमधील कॉंग्रेसचे आमदार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 4, 2024, 9:59 PM IST

Updated : Feb 4, 2024, 10:51 PM IST

बिहारमधील कॉंग्रेसच्या आमदारांना फोडाफोडीच्या राजकारणापासून वाचवण्यासाठी कॉंग्रेसची युक्ती

पाटणा (बिहार) Bihar Congress MLAs : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजद पक्षाचे नेते तेजस्वी यादव यांची साथ सोडून भाजपाशी घरोबा केला आहे. त्यांनी आता भाजपासोबत सत्ता स्थापन करण्याचं ठरवलं आहे. सत्तास्थापनेकरिता बिहारमधील आमदारांची फ्लोअर टेस्ट होणार आहे.

नितीश कुमारांकडून कॉंग्रेसचे आमदार फोडले जाण्याची भीती कॉंग्रेस पक्षाला सतावत आहे. यामुळेच बिहारमधील काँग्रेसच्या आमदारांना हैदराबादला पाठवण्यात आलं आहे. 19 पैकी 16 आमदार विमानानं तेलंगणातील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले आहेत. खरं तर, गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, 12 फेब्रुवारीला बिहार विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याआधी एनडीए हा काँग्रेसच्या आमदारांवर डोळा ठेवून आहे. अशा परिस्थितीत पक्षातील आमदारांची फोडाफोड होण्यापासून वाचवण्यासाठी बिहारमधील कॉंग्रेसच्या सर्व आमदारांना हैदराबादला हलवण्यात आलं आहे.

  • बिहार काँग्रेसचे आमदार हैदराबादला स्थलांतरित: मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी कॉंग्रेसचे 19 पैकी 16 आमदार हैदराबादला पोहोचले आहेत. उर्वरित तीन आमदारही लवकरच त्यांच्यात सामील होतील. विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेसचे आमदार अजित शर्मा म्हणाले की, आम्ही सर्व आमदार हैदराबाद शहराला भेट देण्यासाठी आलो आहोत.

बिहार काँग्रेस अध्यक्ष काय म्हणाले? बिहारमधील प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह यांनी आमदारांची फोडाफोड होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. ते म्हणाले की, तेलंगाणात नुकतेच आमचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे आम्ही सीएम रेवंत रेड्डी यांना भेटायला आलो आहोत. बिहार काँग्रेस अध्यक्ष म्हणाले, नवे सरकार स्थापन झाले आहे. आम्ही सर्वजण येथे पोहोचलो आहोत. दरम्यान आम्ही तेलंगाणाच्या मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांचे अभिनंदन करणार आहोत.

  • बिहारमध्ये काँग्रेसचे 19 आमदार : बिहार विधानसभेत काँग्रेसचे 19 आमदार आहेत. राजद, भाजपा आणि जदयु नंतर काँग्रेस राज्यात चौथा सर्वांत मोठा पक्ष आहे. शकील अहमद खान हे विधीमंडळ पक्षाचे नेते आहेत. तर राजेश राम विधानसभेतील व्हिप आहेत.

काँग्रेस आमदारांची नावे : शकील अहमद खान आणि राजेश राम यांच्याशिवाय बिहार काँग्रेसच्या 19 आमदारांमध्ये अजित शर्मा, अजय कुमार सिंग, अफाक आलम, अबिदुल रहमान, मनोहर सिंग, क्षत्रपती यादव, आनंद शंकर, संतोष मिश्रा, मुरारी गौतम, नीतू यांचा समावेश आहे. सिंग, प्रतिमा दास, इझारुल हुसेन, विश्वनाथ राम, विजय शंकर दुबे, विजेंद्र चौधरी, सिद्धार्थ आणि मुन्ना तिवारी यांचादेखील समावेश आहे.

हेही वाचा:

  1. "काकांच्या मृत्यूची वाट बघताय", अजित पवारांवर जितेंद्र आव्हाडांची घणाघाती टीका
  2. गॅंगस्टर लॉरेन्स बिन्सोईच्या संपर्कात असलेल्या गॅंगस्टरला पुण्यातून अटक, दोन देशी पिस्तुलासह मॅकझीन जप्त
  3. शरद पवार गटातदेखील गटबाजी? कार्यकर्ता मेळाव्याचं खासदार श्रीनिवास पाटलांना निमंत्रण नाही!

Last Updated : Feb 4, 2024, 10:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.