चंदीगड Baba Tarsem Singhs murder : उत्तरखंडमध्ये श्री नानकमत्ता साहेब गुरुद्वारा डेराकार बाबा तरसेम सिंह यांच्यावर हल्ला करुन ठार केल्यानं मोठी खळबळ उडाली होती. या हल्ल्यातील नराधमांची उत्तराखंडमधील एसटीएफच्या जवानांसोबत चकमक उडाली. या चकमकीत एका मारेकऱ्याला कंठस्नान घालण्यात एसटीएफच्या जवानांना यश आलं. अमरजीत सिंग असं या हल्ल्यात ठार झालेल्या मारेकऱ्याचं नाव आहे. या घटनेत आणखी एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.
बाबा तेरसेम सिंह यांचा हत्या : श्री नानकमत्ता साहेब गुरुद्वारा डेरा कार सेवाचे प्रमुख तरसेम सिंह तोमर यांची 28 मार्चला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे देशभरात मोठी खळबहळ उडाली. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे पोली विभागही चक्रावून गेला. या हत्येनंतर पोलीस महासंचालक अभिनव कुमार यांनी " आम्ही मारेकऱ्यांना लवकरच पकडू, " असं स्पष्ट केलं. डेरा कार सेवाचे प्रमुख बाबा तरसेम सिंह यांची हत्या केल्यानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे श्री नानकमत्ता साहेब गुरुद्वारात गेले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करुन आढावा घेतला.
चकमकीत मारेकऱ्याला घातलं कंठस्नान : मारेकऱ्यांनी श्री नानकमत्ता साहेब गुरुद्वारा डेरा कार सेवा प्रमुख बाबा तरसेम यांची हत्या केल्यानं परिस्थिती चिघळली होती. नागरिक संतप्त झाल्यानं पोलीस विभागानं मारेकऱ्यांचा कसून शोध घेतला. यावेळी एसटीएफच्या जवानांनी भगवानपूर परिसरात मारेकऱ्यांना घेरलं होतं. यावेळी हल्लेखोरांनी पोलिसांवर हल्ला केल्यानं यावेळी एसटीएफच्या जवानांना अमरजीत सिंग या आरोपीला कंठस्नान घालण्यात यश आलं. तर त्याचा एक साथिदार पलायन करण्यात यशस्वी झाला, अशी माहिती उत्तराखंडचे पोलीस महासंचालक अभिनव कुमार यांनी दिली.
हेही वाचा :
- मैत्रिणीचं अपहरण करत मागितली खंडणी, पैसे मिळाल्यानंतरही खून करणाऱ्या तिघांना अटक - Pune Murder News
- आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू प्रशांतच्या हत्या प्रकरणात तरुणीसह प्रियकराला अटक, गुन्ह्याचं काय कारण? - badminton player Prashant murder
- उत्तराखंडमधील नानकमट्टाच गुरुद्वारा प्रमुखाची हत्या; तीन महिन्यांत दोन धर्मगुरूची हत्या - Baba Tarsem Singh Murder