अयोध्या Gold Ramayana : रामनवमीला श्रीराम जन्मोत्सवानिमित्त भाविकांकडून मंदिरात विविध दान देण्याची प्रक्रिया सुरुूआहे. याच दरम्यान एका भक्तानं रामलल्लाला सात किलो सोन्याचं रामायण अर्पण केलंय. सोन्याच्या पानांवर लिहिलेलं हे रामायण गर्भगृहात ठेवण्यात आलंय.
कसं आहे सोन्याचं रामायण : राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेच्या वेळी सेवानिवृत्त आयएएस अधिकारी लक्ष्मी नारायण यांनी आपल्या आयुष्याची मिळकत रामलल्लाला समर्पित करण्याचा संकल्प केला होता. यासाठी 5 कोटी रुपये खर्चून 151 किलो वजनाचा रामचरित मानस तयार करण्यात आलाय. यात 10,902 श्लोक असलेल्या रामायणाच्या प्रत्येक पानावर 24 कॅरेट सोन्याचा लेप आहे. सोनेरी प्रतिकृतीमध्ये अंदाजे 480 ते 500 पृष्ठं आहेत. या रामायणाच्या तयारीमध्ये 140 किलो तांब्याचाही वापर करण्यात आलाय. त्याची एकूण किंमत पाच कोटी रुपये आहे. हे रामायण सध्या मंदिराच्या गर्भगृहात ठेवण्यात आलंय.
नऊ दिवसीय राम नवमी जन्मोत्सव सुरू : चैत्र शुक्ल नवरात्रीच्या प्रारंभासह, राम नगरी अयोध्येत राम नवमी सोहळा सुरू झालाय. पहिल्या दिवशी 2 लाख भाविक अयोध्येत पोहोचले. सरयू नदीत स्नान केलं तसंच हनुमान गढी आणि राम मंदिरात दर्शन करत पूजाही केली. राम मंदिरात नवरात्रीच्या प्रारंभी पहाटे 4:30 वाजता रामलल्लाचा जलाभिषेक व शृंगार पूजन करण्यात आलं. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टनं सांगितलं की, प्राणप्रतिष्ठेनंतर प्रथमच भगवानांच्या वस्त्रांची शैली बदलण्यात आलीय. रामलल्ला रंगीबेरंगी रेशीम तसंच सुती कपड्यांमध्ये मोर आणि सोन्या-चांदीच्या ताऱ्यांसह इतर वैष्णव प्रतीकांसह नक्षीकाम केलेलं दिसेल. मंदिराच्या गर्भगृहात चांदीचा कलश बसवण्यात आलाय. 9 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाची सुरुवात 11 वैदिक आचार्यांनी नवह पारायण, राम रक्षास्त्रोथ आणि वाल्मिकी रामायणातील दुर्गा सप्तशतीच्या पठणानं झाली.
मंदिरांमध्ये रामकथा सुरू : मंगळवारपासून मठ तसंच मंदिरांमध्ये भगवान श्रीराम जयंती उत्सवाला सुरुवात झालीय. अयोध्येतील मठ मंदिरांमध्ये रामकथा, रामलीला आणि भजन संध्याचं आयोजन केलं जातं. दशरथ महालात डॉ. रामानंद दास, बडा भक्तमाळ बागेत रमेश भाई ओझा, राम वल्लभ कुंजमध्ये प्रेमभूषण, सियाराम किल्ल्यातील प्रभंजनानंद शरण, हिंदू धाम डॉ. रामविलास दास वेदांती, आचार्य लक्ष्मण दास तथा अन्य मंदिरात लोकांसाठी रामकथेचं संगीतमय आयोजन करण्यात आलं होतं.
हेही वाचा :