नवी दिल्ली Delhi CM Announcement : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचं तुरुंगातून बाहेर आल्यावर घोषित केलं. त्यांनी राजीनामा घोषित केल्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर कोणाची वर्णी लागणार याची मोठी चर्चा सुरू होती. मात्र, आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी 'आतिशी' खेळी करत विरोधकांना नामोहरम करुन टाकलं आहे. आपच्या नेत्या आतिशी मार्लेना (Atishi Marlena) यांच्या गळ्यात अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची माळ टाकली आहे. त्यामुळं शिला दीक्षित यांच्यानंतर दिल्लीत पुन्हा महिलाराज आलं आहे.
मंत्री आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री : आज आम आदमी पार्टीच्या विधिमंडळ गटाची बैठक दिल्लीत पार पडली. या बैठकीत आम आदमी पार्टीच्या नेत्या तथा मंत्री आतिशी मार्लेना यांच्या नावावर सगळ्या आमदारांनी नेतेपदावर शिक्कामोर्तब केलं. आतिशी या अरविंद केजरीवाल यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. त्यामुळंच अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांच्याकडं तब्बल 5 विभागाचा पदभार सोपवला. त्यानंतर आता दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे.
भारताच्या 28 पैकी 12 राज्यांमध्ये 16 महिला मुख्यमंत्री : आतिशी आता दिल्लीच्या मुख्यमंत्री बनण्याच्या तयारीत असताना, स्वतंत्र भारताच्या इतिहासातील महिला मुख्यमंत्र्यांवर एक नजर टाकूया. आतापर्यंत, भारतातील 28 पैकी 12 राज्यांमध्ये 16 महिला मुख्यमंत्री झाल्या होत्या. या सर्वांमध्ये शीला दीक्षित यांनी सर्वात जास्त काळ सेवा बजावली आहे तर, जानकी रामचंद्रन यांनी मुख्यमंत्री म्हणून सर्वात कमी कालावधी सेवा बजावली आहे.
- देशातील 16 महिला मुख्यमंत्री -
1 - सुचेता कृपलानी, पहिली महिला मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, ऑक्टोबर मार्च 1963-1967
2 - नंदिनी सत्पथी, ओडिशाच्या पहिल्या आणि एकमेव महिला मुख्यमंत्री, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, जून 1972 ते मार्च 1973; मार्च 1974 ते डिसेंबर 1976
3 - शशिकला काकोडकर, गोव्याच्या पहिल्या मुख्यमंत्री, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, ऑगस्ट 1973 ते एप्रिल 1979
4 - सय्यदा अन्वेरा तैमूर, आसामच्या पहिल्या मुख्यमंत्री, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, डिसेंबर 1980 ते जून 1981
5 - जानकी रामचंद्रन, तामिळनाडूच्या पहिल्या मुख्यमंत्री, अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम, 7 जानेवारी 1988 ते 30 जानेवारी 1988
6 - जे जयललिता, तामिळनाडूच्या पाचवेळा मुख्यमंत्री, अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम, जून 1991 ते मे 1996, मे 2001 ते सप्टेंबर 2001, मार्च 2002 ते मे 2006, मे 2011 ते सप्टेंबर 2014, मे 2015 ते 2016
7 - मायावती, उत्तर प्रदेश भारतातील पहिल्या दलित महिला मुख्यमंत्री, बहुजन समाज पार्टी, जून 1995 ते ऑक्टोबर 1995, मार्च 1997 ते सप्टेंबर 1997, मे 2002 ते ऑगस्ट 2003, मे 2007 ते मार्च 2012
8 - राजिंदर कौर भट्टल, पंजाबच्या पहिल्या आणि एकमेव महिला मुख्यमंत्री, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, जानेवारी 1996 ते फेब्रुवारी 1997
9 - राबडी देवी, बिहारच्या पहिल्या आणि एकमेव महिला मुख्यमंत्री, राष्ट्रीय जनता डॉ, जुलै 1997 ते फेब्रुवारी 1999, मार्च 1999 ते मार्च 2000, मार्च 2000 ते मार्च 2005
10 - सुषमा स्वराज, दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री दिल्ली, भारतीय जनता पार्टी, ऑक्टोबर 1998 ते डिसेंबर 1998
11 - शीला दीक्षित, दिल्ली इंडियन नॅशनल,काँग्रेस, डिसेंबर 1998 ते डिसेंबर 2013
12 - उमा भारती, मध्य प्रदेशच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री, भाजपा डिसेंबर 2003 ते ऑगस्ट 2004
13 - वसुंधरा राजे, राजस्थानच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री, भाजपा, डिसेंबर 2003 ते डिसेंबर 2008 ( 1ली मुदत); डिसेंबर 2013 ते 2018 पर्यंत
14 - ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस मे 2011 पासून आत्तापर्यंत
15 - आनंदी बहेन पटेल, गुजरातच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री, भारतीय जनता पार्टी, मे 2014 ते ऑगस्ट 2016
16 - मेहबूबा मुफ्ती जम्मू-काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी एप्रिल 2016 ते जून 2018
हेही वाचा -