नवी दिल्ली : दिल्लीत फेब्रुवारी 2025 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. सत्ताधारी आम आदमी पक्ष, भाजपा आणि काँग्रेससह सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. अशातच अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानं दिल्लीची आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी (1 डिसेंबर) दुपारी पत्रकार परिषद घेत अरविंद केजरीवाल यांनी याबाबतचा निर्णय जाहीर केला.
पक्षाची भूमिका स्पष्ट : आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षासोबत युती करणार नसल्याचे आम आदमी पक्षानं स्पष्ट केलं. अरविंद केजरीवाल यांनी ही घोषणा केली. सर्व 70 विधानसभा जागांवर आम आदमी पक्ष आपले उमेदवार उभे करणार असल्याची माहिती 'आप'कडून देण्यात आली आहे. काँग्रेसनं हरियाणा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला सोबत घेतलं नव्हतं. तसंच त्या निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता केजरीवाल यांच्या पक्षानं दिल्ली विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.
#WATCH AAP के राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल ने कहा, " मुझे उम्मीद थी कि अमित शाह मेरे द्वारा मुद्दा (कानून और व्यवस्था) उठाए जाने के बाद कुछ कार्रवाई करेंगे... लेकिन, इसके बजाय, मेरी पदयात्रा के दौरान मुझ पर हमला किया गया। मुझ पर तरल पदार्थ फेंका गया, यह हानिरहित था, लेकिन यह… pic.twitter.com/b6GQyQGnnx
— ANI_HindiNews (@AHindinews) December 1, 2024
उमेदवारांची यादी जाहीर : आम आदमी पक्षानं विधानसभा निवडणुकीसाठी 11 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ज्यात काँग्रेस आणि भाजपामधून आलेल्या 6 नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. यामध्ये यापूर्वी भाजपाचे आमदार राहिलेले काही नेते आहेत. पक्षातील स्थिती मजबूत करण्यासाठी आम आदमी पक्ष इतर पक्षांच्या नेत्यांना आपल्या पक्षात सामील करून घेत आहे.
अरविंद केजरीवालांवर द्रव पदार्थ फेकण्याचा प्रयत्न : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाचे नेते हे प्रचारासाठी पायाला भिंगरी बांधल्यासारखं फिरत आहेत. दिल्लीच्या ग्रेटर कैलास भागात पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवाल यांच्यावर एका व्यक्तीनं द्रव पदार्थ फेकण्याचा प्रयत्न केला. या व्यक्तीला अरविंद केजरीवाल यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लगेच ताब्यात घेतलं. हल्ल्याबाबत मंत्री सौरभ भारद्वाज म्हणाले की, "भाजपा नेते सर्व राज्यांमध्ये सभा घेतात, त्यांच्यावर कधीही हल्ला होत नाही. अरविंद केजरीवाल यांच्यावर सातत्यानं हल्ले होत आहेत. नांगलोई येथेही त्यांच्यावर हल्ला केला. तसंच छतरपूरमध्येही त्यांच्यावर हल्ला झाला. दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे आणि केंद्र सरकार आणि गृहमंत्री काहीही करत नाहीत."
हेही वाचा