ETV Bharat / bharat

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा निवडणुकीचा वाद मिटेना! अमोल कीर्तिकर यांनी उच्च न्यायालयातील याचिकेत काय म्हटले? - Maharashtra politics - MAHARASHTRA POLITICS

Maharashtra politics लोकसभा निवडणुकीच्या निकालावरुन शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अमोल कीर्तिकर यांनी एकनाथ शिंदे गटाचे नेते रवीद्र वायकर यांच्यातला वाद न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. अमोल कीर्तिकर यांनी वायकर यांच्या लोकसभेतील विजयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

AMOL KIRTIKAR, Ravindra waikar
अमोल कीर्तिकर,रवींद्र वायकर (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 17, 2024, 8:32 AM IST

Updated : Jul 17, 2024, 4:51 PM IST

मुंबई Maharashtra politics उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे पक्षाचे पराभूत उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते रवींद्र वायकर यांच्या लोकसभा विजयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायलयात दाखल केली आहे. त्यांनी मतमोजणी प्रक्रियेत त्रुटी असल्याचा याचिकेत दावा केल्याची माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अनिल परब यांनी दिली.

अमोल कीर्तिकर यांचा ४८ मतांनी पराभव: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षाचे नेते रवींद्र वायकर यांच्याकडून अमोल कीर्तिकर यांचा ४८ मतांनी पराभव झाला. कीर्तिकर यांनी यापूर्वीच लोकसभा निवडणूक निकालाविरोधात राज्य निवडणूक आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. या याचिकेत अमोल कीर्तिकर यांनी शिवसेनेचे विजयी उमेदवार खासदार रवींद्र वायकर यांना प्रतिवादी केले आहे. तसेच परमेश्वर रंजन, राजेश मल्लाह, समीर मोरे, बाळा नाडर, सुरेंदर अरोरा रोहन सातोणे, अ‍ॅड. संजीव कुमार कलकोरी, अ‍ॅड. लता शिंदे आणि मनोज नायक यांच्यासह एकूण वीस उमेदवारांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी: याचिकेत म्हटले, मतमोजणी पुन्हा करण्याची वारंवार मागणी करुनही त्या मागणीकडे निवडणूक अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. संविधानिक तरतुदींकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आले. याबाबत असलेल्या कायदेशीर तरतुदी धाब्यावर बसवण्यात आल्या आहेत. मतमोजणी केंद्रातील व्हिडिओ चित्रीकरण कीर्तिकर यांनी निवडणूक आयोगाकडे मागितले होते. मात्र, ते त्यांना देण्यात आले नाही, अशा तक्रारी करण्यात आल्या आहेत.

मतमोजणी दरम्यानचे चित्रीकरण न्यायालयाने मागवून घ्यावे- मतमोजणी दरम्यानचे चित्रीकरण सुनावणी दरम्यान न्यायालयाने मागवून घ्यावे, त्याची पाहणी करावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या प्रकरणात निवडणूक अधिकाऱ्यांनी पूर्णतः बेकायदेशीर काम केले आहे. मतमोजणी केंद्र परवानगी नसतानाही विजयी उमेदवाराच्या प्रतिनिधींनी अवैधपणे वापर केला. या आरोपावर याचिकेत लक्ष वेधण्यात आले आहे. मतमोजणीतील गोंधळ तपासून कीर्तीकर यांना विजयी घोषित करावे अशी मागणी देखील करण्यात आली आहे. कीर्तिकर यांनी यापूर्वी राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून मतमोजणी केंद्रावरील ईव्हीएममध्ये छेडछाड केली असल्याची तक्रार दाखल केली होती. त्याची माहिती याचिकेत देण्यात आली आहे.

हेही वाचा

  1. अमोल कीर्तिकरांना मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज देण्यास जिल्हाधिकाऱ्यांचा नकार - Amol Kirtikar
  2. एका मताचा फरक ते 48 मतांनी विजय : विजयी खासदाराला पराभूत करण्याचा अधिकार आहे का? - Ravindra Waikar Wins Controversy
  3. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील निकालावर शंका, अमोल कीर्तिकर न्यायालयात घेणार धाव - lok Sabha Election Result 2024

Last Updated : Jul 17, 2024, 4:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.