नवी दिल्ली Air service to Nanded started : शिखांचे पवित्र धार्मिक स्थळ असलेलं नांदेड आता हवाई मार्गानं जोडलं जाणार आहे. पंजामधील जालंधरच्या विमानतळावरून 31 मार्चपासून विमानसेवा सुरू होत आहे. यासाठी स्टार एअरलाइन्सनं तयारी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात पंजाबमधील आदमपूर एअरबेस (जालंधर जिल्हा) ते नांदेड, अशी हवाई सेवा सुरू होईल.
पहिलं विमान 31 मार्च रोजी उड्डाण करणार : पंजाबमधील जालंधर ते नांदेड अशी विमानसेवाल 31 मार्चपासून प्रवाशांच्या सेवेत हजर होणार आहे. जालंधर आदमपूर विमानतळावरून नांदेडसाठी पहिलं विमान 31 मार्च रोजी उड्डाण करेल. स्टार एअर (एअरलाइन) या मार्गांवर हवाई सेवा चालवणार आहे. स्टार एअरच्या वेबसाइटवर जालंधर नांदेड फ्लाइटचं तिकीट बुकिंग सुरू झालं आहे. प्रवाशी स्टार एअरच्या वेबसाइटवर भेट देऊन तिकीट बुक करू शकता. स्टार एअरच्या वेबसाइटनुसार, आदमपूर ते नांदेड दरम्यान विमानानं प्रवास करण्यासाठी, इकॉनॉमी क्लासचं भाडं सुमारे 5 हजार 600 रुपये असणार आहे. त्यामुळं प्रवाशांचा वेळ वाचणार असून प्रवाशांना आता फक्त दोन तासात नांदेडला पोहचाता येणार आहे.
31 मार्चपासून नांदेडला विमानसेवा : हिंडन विमानतळाच्या संचालिका सरस्वती व्यंकटेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सध्या हिंडन विमानतळावरून किशनगड, लुधियाना आणि भटिंडा येथे हवाई सेवा सुरू आहे. 31 मार्चपासून आदमपूर (जालंधर) आणि नांदेड (महाराष्ट्र) दरम्यान विमानसेवा सुरू होणार आहे'.
सकाळी 7:15 वाजता पहिलं विमान : अहमदपूर ते नांदेडसाठी सकाळी 7:15 वाजता पहिलं विमान उड्डाण करेल, जे सकाळी 8:35 वाजता नांदेडला पोहोचेल. यासाठी प्रवाशी ऑनलाईन तिकीट बुकिंग करू शकता. आतापर्यंतचं हे सर्वात स्वस्त विमान तिकीट असणार आहे. यामध्ये शासनाकडून अनुदानही दिलं जात आहे. आदमपूरला विमानसेवा सुरू करण्याची घोषणा यापूर्वी करण्यात आली होती. या उड्डाण सुरू होण्याच्या तारखेत अनेक वेळा बदल करण्यात आले आहेत, मात्र यावेळी तिकीट बुकिंग सुरू झाल्यानं 31 मार्चपासून विमानसेवा सुरू होणार असल्याचं निश्चित झालं आहे.
हे वचालंत का :
- Pawar election symbol tussle : अजित पवार यांना घड्याळ चिन्ह वापरण्यास कोर्टाची सशर्त परवानगी; शरद पवारांना 'तुतारीवाला माणूस' बहाल
- Jyoti Mete Joins NCP : महायुतीला मोठा धक्का; ज्योती मेटे करणार शरद पवार गटात प्रवेश, पंकजा मुंडे विरुद्ध ज्योती मेटे सामना?
- लखन भैय्या चकमक प्रकरणी माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्माला जन्मठेप; काय आहे नेमकं प्रकरण?