ETV Bharat / bharat

उपराज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिलं उत्तर; वित्त आणि आरोग्य सचिव बदलण्याची केली मागणी - एलजी विनय कुमार

CM Arvind Kejriwal reply to LG letter : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उपराज्यपाल (लेफ्टनंट गव्हर्नर) विनय कुमार सक्सेना यांच्या पत्राला उत्तर देताना आरोग्य आणि वित्त सचिवांना हटवण्याची मागणी केली आहे. दरम्यान, उपराज्यपालांनी अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहीत रुग्णालयांमधील मनुष्यबळाच्या कमतरेतवर प्रश्न उपस्थित केले होते.

cm kejriwal responded to lg letter demanding change of finance and health secretary
उपराज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिलं उत्तर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 4, 2024, 8:15 PM IST

नवी दिल्ली CM Arvind Kejriwal reply to LG letter : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्या पत्राला लेखी उत्तर देताना वित्त आणि आरोग्य सचिवांना लवकरात लवकर बदलण्याची मागणी केली आहे. दरम्यान, दिल्ली सरकारच्या आरोग्य विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रुग्णालयांच्या दुरवस्थेवर उपराज्यपालांनी तीव्र चिंता व्यक्त केली होती. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिलं होतं. पत्रात, त्यांनी रुग्णालयांमधील कर्मचाऱ्यांच्या कमतरतेवर प्रश्न उपस्थित केला होता. आरोग्य सुविधांच्या पायाभूत सुविधांना अपुरी असल्याचंही म्हटलं होतं.

अत्यावश्यक सुविधांचा अभाव आणि न्यायालयानं उपस्थित केलेल्या महत्त्वाच्या समस्यांमुळे रुग्णांना होणारा त्रास दूर करण्याबरोबरच रुग्णालयांची स्थिती सुधारण्यासाठी उपराज्यपालांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्र लिहिलं होतं. या पत्राला उत्तर देताना मुख्यमंत्री केजरीवाल यांनी त्यांना 3 फेब्रुवारी रोजी उपराज्यपालांचे पत्र मिळाल्याचं सांगितलं. तसंच यासंदर्भात आरोग्यमंत्र्यांकडून उत्तर मागवण्यात आल्याचंही त्यांनी पत्रात लिहिलं असल्याचं मुख्यमंत्री केजरीवाल यांनी म्हटलं.

मुख्यमंत्री केजरीवाल यांचे उपराज्यपालांच्या पत्राला उत्तर : विनय कुमार सक्सेना यांच्या पत्राला उत्तर देत आपचे संस्थापक केजरीवाल म्हणाले की, "निवडून आलेल्या सरकारच्या मंत्र्यांचे आदेश वरिष्ठ अधिकारी पाळणार नाहीत, तर सरकार कसं चालेल? यापूर्वी वित्त सचिव आशिष वर्मा यांनी डॉक्टरांचे पगार, फरिश्ते योजना, औषध बिले, दिल्ली आरोग्य कोर्स योजना आणि इतर योजनांचे पैसे रोखले होते. त्यामुळं संपूर्ण आरोग्य यंत्रणा ठप्प झाली होती. यासंदर्भात मी अनेकवेळा वैयक्तिक भेटीगाठी घेतली.

दिल्लीची आरोग्य व्यवस्था ढासळली- अधिकारी अर्थमंत्र्यांचे आदेश मानण्यास टाळाटाळ करत असल्याचं लेखी सांगितलं. तसंच अर्थ सचिव आणि आरोग्य सचिव आपल्या मंत्र्यांच्या आदेशाचं पालन करत नाहीत. त्यामुळं दिल्लीची आरोग्य व्यवस्था ढासळत चालली आहे. दिल्लीतील जनतेच्या हितासाठी या दोन्ही अधिकाऱ्यांना लवकरात लवकर हटवून अन्य काही अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी", असं केजरीवाल यांनी पत्रात नमूद केलं.

हेही वाचा -

  1. अरविंद केजरीवाल समन्सला देत नाहीत उत्तर; ईडीनं घेतला 'हा' मोठा निर्णय
  2. दिल्ली दारू घोटाळा; अरविंद केजरीवाल यांच्या घरी आजही धडकले पोलीस
  3. गुन्हे शाखेचं पथक अरविंद केजरीवालच्या घरी पोहोचलं, वाचा काय आहे प्रकरण?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.