चेन्नई : भारतातील सर्वाधिक वाचले जाणारे तेलुगु वृत्तपत्र 'ईनाडू'नं सुवर्णमहोत्सवी वर्ष (50 Years of Eenadu) पूर्ण करुन 51 व्या वर्षात यशस्वीपणे प्रवेश केलाय. हे वृत्तपत्र 10 ऑगस्ट 1974 रोजी विशाखापट्टणम येथे प्रथम प्रकाशित झालं. पुढं भारताच्या मीडिया उद्योगात यानं एक वेगळं स्थान मिळवलं.
दिवंगत रामोजी राव यांच्या विचारातून निर्माण झालेली मशाल, 'ईनाडू'नं ज्ञान आणि माहितीच्या क्षेत्रात मोठी क्रांती घडवली. वेळोवेळी नवीन प्रयोग करत 'ईनाडू'नं समाजाला दिशा देण्याचं काम केलंय. तसंच दिवसेंदिवस त्यांचा विस्तार होत आहे. अशा परिस्थितीत 'ईनाडू' दैनिकाच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त 'ईनाडू' प्रशासनानं विशेष सुवर्ण महोत्सवी पुस्तिका तयार केली आहे. ही पुस्तिका वैयक्तिकरित्या विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आली आहे.
एमके स्टॅलिन यांना सुवर्ण महोत्सवी पुस्तिका भेट : ईटीव्ही समूहाच्या वतीनं, ईनाडू न्यूज पेपरचे रिजनल प्रमुख नितीश चौधरी, ईटीव्ही इंडिया तमिळनाडू ब्युरो हेड पंडियाराज आणि ईनाडू तामिळनाडूचे वरिष्ठ प्रतिनिधी इरितातुल्ला यांनी सुवर्ण महोत्सवी पुस्तिका तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांना भेट दिली.
दिवंगत रामोजी राव यांचं केलं स्मरण : मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांना ही पुस्तिका भेट दिल्यानंतर त्यांनी तेलुगु भाषिक राज्यांमधील 'ईनाडू' वृत्तपत्राचा इतिहास आणि वृत्तसेवा याविषयी तपशीलवार माहिती घेतली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी 'ईनाडू' वृत्तपत्राचे संस्थापक रामोजी राव यांचं स्मरण केलं. त्यांनी 'ईनाडू'च्या 50 व्या वर्धापनदिनानिमित्त अभिनंदन केलं आणि सांगितलं की, त्यांनी लोकांची अशीच सेवा सुरू ठेवावी. दरम्यान, हे लक्षात घेण्याजोगं आहे की, गेल्या अर्ध्या शतकापासून 'ईनाडू' हे केवळ लोकांचं दैनिकच नाही तर सामाजिकदृष्ट्या जबाबदार आणि राष्ट्रीय आपत्तींच्या वेळी लोकांचं रक्षण करणारं देखील आहे.
हेही वाचा -
- रामोजी ग्रुपने आंध्र-तेलंगाणातील पूरग्रस्तांसाठी दिली 5 कोटी रुपयांची भरघोस मदत, लोकांनाही केलं मदतीचं आवाहन - Ramoji Group donates Rs 5 crore
- सामाजिक बांधिलकी जपणारं 'ईनाडू' नैसर्गिक आपत्तीत लोकांचं ठरलं तारणहार - Eenadu Golden Jubilee
- 'ईनाडू'च्या गौरवशाली प्रवासाची 50 वर्षे पूर्ण, प्रादेशिक भाषेत अग्रगण्य राहून घडविली 'माहिती क्रांती' - Eenadu Golden Jubilee