Miraj Special Holi 2022 : पुरुषांना झोडपुन महिला साजरी करतात होळी; मिरजेतील गोसावी समाजाची 100 वर्षांची परंपरा - गोसावी समाज होळी परंपरा मिरज

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Mar 19, 2022, 4:25 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

सांगली - होळीच्या निमित्ताने पुरुष मंडळीची महिलांकडून यथेच्या धुलाई करून अनोखी होळी साजरी करण्याचा प्रथा मिरजेत गोसावी समाजाकडून जोपासली जात आहे. ( Wife Beats Husband on Holi ) होळीच्या तिसऱ्या दिवशी "झेंड्याचा खेळ" या माध्यमातून महिला पुरुषाना काठीने बदडून काढतात. गोसावी समाजात शेकडो वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. ( Miraj Gosavi Community Tradition ) या प्रथेमुळे महिलांना वर्षातून एकदा पुरुषांना मनसोक्त बदडून काढायची संधी मिळते. महाराष्ट्रातील गोसावी समाजाकडून होळी वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. गल्लीच्या मध्यभागी झेंडा बांधला जातो. ज्याची कमानही महिलांची हाती असते, सर्व महिला या झेंड्याची रक्षण करण्यासाठी हातामध्ये काठ्या घेऊन सज्ज असतात. रंगांची उधळण करत पुरुषांनी तो झेंडा पळवायचा खेळ असतो. तर महिला त्यांना त्यापासून रोखतात. यावेळी पुरुष मंडळींना पिटाळून लवण्यासाठी महिला त्यांना काठीने बदडून काढतात. गेल्या 100 वर्षापासून ही परंपरा गोसावी समाज बांधवाकडून जोपासली जात आहे. एरव्ही पत्नीस मारहाण करणारे पती, यानिमित्ताने महिलांकडून आनंदाने मार खात असतात, हे या खेळाचे वैशिष्ट्य आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.