VIDEO: वसईच्या गिरीज गावात दोन गटात तुंबळ हाणामारी - Violent clashes Girija
🎬 Watch Now: Feature Video

पालघर - वसईच्या गिरीज गावात दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी संध्याकाळी घडली आहे. या संपूर्ण मारहाणीचा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. गिरीज गावात बावखल बुजवण्याच्या कामावरून वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. गिरीज येथे स्रिमीता डिसील्वा यांचे खासगी जागेत मातीभारावाचे काम चालू होते. त्याला आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष दत्ता सांबरे यांनी विरोध केला. त्यांचे फोटो काढल्याच्या रागातून डिसील्वा यांनी सांबरे यांना मारहाण केली आहे. त्यानंतर सांबरे यांनी १० ते १२ जणांची मंडळी बोलावून डिसील्व्हा यांना जबर मारहाण केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मंगळवारी रात्री वसई पोलीस ठाण्यात याप्रकरणी दोन्ही गटांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST