उद्धव ठाकरे बळजबरीने मुख्यमंत्री.. भाजपवर सूड उगविण्यासाठी शिवसेनेला हवंय गृहखातं : सुधीर मुनगंटीवार

By

Published : Apr 1, 2022, 9:35 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST

thumbnail
चंद्रपूर : मुख्यमंत्रीपद असलेल्या शिवसेनेला आता गृहविभाग हवा, हे ऐकून आश्चर्य वाटल्याची प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद हवे हे माहीतच आहे. आता अदलाबदल होते का? असा टोला त्यांनी लगावला. शिवसेनेला गृहविभाग भाजपवर सूड उगवण्यासाठी हवाय कल्याणासाठी नको, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. उद्धव ठाकरे यांचा हात शरद पवारांनी बळजबरीने वर केला. त्यामुळे हे जबरदस्तीचे मुख्यमंत्री असल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले. जनतेला दिलासा देण्याऐवजी केवळ घोषणा करणारे हे सरकार गृहमंत्रालय हाती घेऊन काय करणार, असा सवाल त्यांनी विचारला. सर्व तपास यंत्रणा मुख्यमंत्र्यांच्या कार्यकक्षेत असताना पुन्हा गृहविभाग हवाच कशाला, असा प्रश्न विचारत ही स्थिती नाचता येईना अंगण वाकडे, अशी असल्याचा घणाघात मुनगंटीवार यांनी केला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.