CM Eknath Shinde Residence Security : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी Z सुरक्षा - Z security
🎬 Watch Now: Feature Video
ठाणे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी मुख्यमंत्री पदाची शपत घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवास्थानी सुरक्षा वाढवण्यात आली ( Z Security At Thane Residence ) आहे. ठाणे पोलीस सह आयुक्त दत्तात्रय कराळे, अप्पर पोलीस आयुक्त पंजाबराव उबाळे यांच्यासह सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या निवास्थानी लावण्यात आलेल्या सुरक्षेचा आढावा घेतला. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या निवास्थानी भेट घेत आढावा घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने याठिकाणी कंट्रोल रूम, सिसिटीव्ही कॅमेरे, बॅरेकेटिंग, वाहतूक कोंडीच नियोजन आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये यादृष्टीने नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे पोलीस ( Thane Police ) सह आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी यावेळी दिली.