Man fell into waterfall: तामिळनाडूत फोटोसाठी पोझ देताना तरुण पडला धबधब्यात - दिंडीगुलमध्ये धबधब्याजवळ व्हिडिओसाठी पोज
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16012350-404-16012350-1659609937111.jpg)
दिंडीगूल ( तमिळनाडू ) - तामिळनाडुतील दिंडीगुलमध्ये धबधब्याजवळ व्हिडिओसाठी पोज देणारा तरुण धबधब्यात कोसळल्याची ( Man fell into waterfall ) घटना समोर आली आहे. सध्या त्या तरूणाचा शोध सुरू ( Police and Fire Departments searching young man ) आहे. मुसळधार पावसामुळे पुलावेली धबधबा ओसांडून वाहत आहे. अनेत पर्यटक तिथे हजेरी लावत आहेत. अजय पांडियन असे धबधब्यात कोसळलेल्या तरूणाचे नाव आहे. अनपेक्षितपणे पाय घसरून त्यांचा तोल गेला ( lost balance )आणि शंभर फूट धबधब्यात तो पडला. तत्काळ त्याच्या मित्राने आरडाओरड केल्याने तेथील पर्यटकांनी तत्काळ पोलीस व अथूर अग्निशामक विभागाला माहिती दिली. तेथे पोहोचलेले पोलीस आणि अग्निशामक विभागाकडून 5 तासांहून अधिक काळ शोध मोहिम सुरू आहे. याप्रकरणी थंडीगूडी पोलीस विभागाने गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास करत आहेत. मात्र हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.