Video : दरड कोसळल्याने यमुनोत्री महामार्ग बंद.. पहा अंगावर काटे आणणारा भयावह व्हिडीओ - Uttarakhand Yamunotri Dham

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 2, 2022, 10:42 AM IST

उत्तरकाशी ( उत्तराखंड ) : खनेडा पुलाजवळ दगड कोसळल्याने यमुनोत्री महामार्ग ठप्प झाला ( Yamunotri highway closed due to landslide ) आहे. मुसळधार पाऊस आणि दरड कोसळल्याने आज सकाळपासून महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे यमुनोत्री धामला ( Uttarakhand Yamunotri Dham ) जाणारे व येणारे भाविक रस्त्याच्या दुतर्फा अडकले आहेत. राज्यात पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे अनेक मार्गांवर डोंगरावरून दरड कोसळत आहेत. मात्र, प्रशासन महामार्ग खुला करण्यात व्यस्त आहे. त्याचवेळी भूस्खलनाचा जो व्हिडिओ समोर आला आहे तो खूपच भयावह आहे. आदल्या दिवशी रुद्रप्रयागमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सिरोबागड हायवे जवळपास 36 तास ठप्प झाला होता, जो आता सुरळीत करण्यात आला आहे. या संवेदनशील भूस्खलन परिसरात NH कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रमानंतर रस्त्यावरील ढिगारा आणि दगड हटवले. त्यानंतर येथे पुन्हा वाहतूक सुरू झाली आहे. यानंतर मार्गावर अडकलेल्या शेकडो प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.