Wild Boar Rescue : रस्त्याच्या कडेला मादी रानडुक्करांने 7 पिल्लांना दिला जन्म; वनविभागाने केला रेस्क्यू, पाहा व्हिडिओ - boar piglets rescued
🎬 Watch Now: Feature Video
मलप्पुरम (केरळ) : केरळमधील मलप्पुरममधील पुरूर येथे सार्वजनिक रस्त्याच्या कडेला एका खाजगी मालमत्तेत एक रानडुक्करांने 7 पिल्लांना जन्म दिला होता. याची माहिती स्थानिकांनी मल्लपुरम वन विभागाला ( mallapuram forest dept ) दिली. यावेळी वनविभागाचे अधिकारी हे तेथे दाखल झाले व त्यांनी त्या रानडुक्कराचे रेस्क्यू केले. यावेळी रानडुक्कराला तेथून पळवण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी फटाके फोडले होते. त्यानंतर त्यांनी पिल्लांना पकडून जंगलात नेऊन सोडले. यावेळी वनकर्मचाऱ्यांनी स्थानिक लोकांना इशारा दिला की मादी डुक्कर आपल्या पिलांच्या शोधात परत येईल आणि जर ती आपल्या पिलांना सापडली नाही तर ती आक्रमक होऊ शकते.