Watermelon Grower Success Story : शेतकरी महिलेने टरबुज पिकात घेतले लाखोंचे उत्पन्न, पाहा व्हिडिओ - सोनाली कोटमे यशोगाथा
🎬 Watch Now: Feature Video
येवला (नाशिक) - शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग शेतकरी नेहमीच राबवत असतो. अशाच प्रकारे येवला तालुक्यातील कोटमगाव येथील सोनाली कोटमे या शेतकरी महिलेने टरबुजाच्या पिकामध्ये लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले ( Watermelon Grower women Farmer Success Story ) आहे. इतर पिकांपेक्षा टरबूजात जास्त उत्पन्न नक्कीच मिळू शकते असे या शेतकरी महिलेने दाखवून दिले आहे. या महिलेने तीन एकरमध्ये टरबुजाचे पीक घेतले. अडीच लाखाच्या आसपास त्यांना खर्च आला. पहिल्याच टरबुजाच्या तोड्यामध्ये साडेतीन लाख रुपये झाल्याने या महिलेचा उत्पादन खर्च निघून लाखरुपया पेक्षा जास्त नफा मिळवला आहे. अजूनही एक तोडा होणार असून दोन ते अडीच लाख रुपये अजूनही मिळतील अशी अपेक्षा या महिलेला आहे. नक्कीच शेतकऱ्याने देखील टरबूज पीक घेतल्यास कमी दिवसात चांगले उत्पन्न मिळेल असे आव्हान या महिलेने शेतकऱ्यांना केले आहे.
Last Updated : May 24, 2022, 8:04 PM IST
TAGGED:
Nashik Latest News