VIDEO : आनंदनगर मेट्रो स्टेशनखाली पाणीच पाणी, अर्धवट कामांचा पुणेकरांना त्रास - VIDEO
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - पुणे शहरात पावसाची संततधार सुरू ( Continuous rain in Pune ) असल्याने, पुणे शहरातील रस्त्यांवर पाणी ( Water on city streets ) साचत असल्याचे दिसून येत आहे. तसेच, पुणे शहरांमध्ये मेट्रोचे काम सुरू ( Metro work continue in city ) आहे. मेट्रोच्या अर्धवट कामामुळे पाणी गळती मोठ्या प्रमाणात होत आहे. पुण्यातील आनंदनगर मेट्रो स्टेशनात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून त्या पाण्यातून पुणेकरांना वाट काढवी लागत आहे. पुण्यातील मेट्रोच्या अर्धवट कामाचा पुणेकरांनाही त्रास होतो आहे.पुण्यात अगोदरच वाहतुकीचे इतके प्रश्न असताना आता मेट्रो स्टेशनच्या खाली पाणी साचत असल्याने आणखी एक प्रश्न पुणेकरांपुढे आहे. तो प्रवास सुखकर होण्याऐवजी त्रास अधिक होतय.