Video : शिक्षक जीव धोक्यात घालून मुलांना ओढा पार करत घेऊन जात आहेत शाळेत.. पहा व्हिडिओ

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail
उत्तरकाशी ( उत्तराखंड ) : जिल्ह्यात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नदी-नाले दुथडी भरून वाहत ( Uttarkashi heavy rain ) आहेत. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्याचवेळी, उत्तरकाशी जिल्ह्यातील ब्रह्मखल ( Uttarkashi Brahmakhal ) भागातून शाळकरी मुलांचा वाहता ओढा ओलांडतानाचा व्हिडिओ समोर आला ( School children crossing Nala in Uttarkashi ) आहे. शाळेतील शिक्षक मुलांना ओढा पार करायला लावताना दिसतात. त्यामुळे शाळकरी मुलांनाही दररोज समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे. उत्तरकाशी जिल्ह्यातील ब्रह्मखल भागातील आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात शिक्षक आपला जीव धोक्यात घालून मुलांना मांजगाव येथील शाळेत ( Uttarkashi Manjgaon School ) जाण्यासाठी वेगाने वाहत असलेला ओढा पार करत आहेत. पावसाळ्यात पाणी साचण्यापासून ते दरड कोसळण्यापर्यंतची परिस्थिती सर्वसामान्यांना त्रासदायक ठरत आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.