Union Budget 2022-23 Expectations : महागाईवर हवा सवलतींचा बुस्टर डोस, महिलावर्गाच्या अपेक्षा - मोदी सरकार अर्थसंकल्प

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jan 29, 2022, 5:52 PM IST

केंद्र सरकारकडून जाहीर होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना महागाईपासून सुटका हवी आहे. याबाबत पुण्यातील महिलांची मते जाणून घेण्यात (Union Budget 2022-23 Expectations) आली. अंकिता बहिरट ही इंटेरिअर डिझायनर सांगते की, नवीन स्टार्टअप करणाऱ्या महिलांना या अर्थसंकल्पामध्ये भांडवलासाठी भरघोस तरतूद करण्यात यावी आणि नवीन उद्योजकांना सरकारकडून प्रशिक्षण कार्यक्रम देखील राबविण्यात यावेत.अॅड. रूपाली ठोंबरे यांनी सांगितले की, महिलांना या अर्थसंकल्पाकडून भरपूर अपेक्षा आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनामुळे असंख्य अडचणींना त्यांना तोंड द्यावे लागले आहे. यामुळे येत्या काळामध्ये गृह उद्योगांना चालना मिळावी. तसेच गॅस दरवाढ जी मोठ्या प्रमाणावर झाली आहे ती कमी करावी अशी अपेक्षा. कोरोनामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. देशामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे. याकडे लक्ष देऊन लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. भाजपाने चांगले अर्थशास्त्राचे अभ्यासकांकडून अर्थ संकल्प तयार करावा. कारण सध्या सामान्य जनतेला सध्या महागाई कमी करण्याची गरज आहे. शिल्पा मारणे या सांगतात की माझी स्वतःची मेस आहे; आम्हाला महागाईमुळे आता घरगुती व्यवसाय करणे देखील परवडत नाही. अशा वेळेस सरकारने गॅस दरवाढ कमी करावी आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. कोरोनाकाळामध्ये मुलांच्या शिक्षणाचा खर्च देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र त्या प्रमाणात उत्पन्न वाढले नाही.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.