Kanha National Park : 'तिचं' मन जिंकण्यासाठी ते दोघे भिडले; पाहा, VIDEO - वाघिनीसाठी भिडले दोन वाघ
🎬 Watch Now: Feature Video
छिंदवाडा - जगप्रसिद्ध कान्हा राष्ट्रीय उद्यानातून ( Kanha National Park ) दोन वाघांच्या लढाईचा ( Kanha National Park two tiger clashed ) एक व्हिडिओ समोर आला आहे. बुधवारी सकाळी उद्यानातील मुक्की झोनमध्ये पर्यटक सफारीसाठी बाहेर पडले होते. तेव्हा त्यांना तीन वाघ दिसले. यातील दोन वाघ तिथे उपस्थित असलेल्या वाघिणीसाठी लढत होते, असे पर्यटकांचे मत आहे. हे दृश्य पर्यटकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आणि सोशल मीडियावर व्हायरल केले. वाघांची लढाई आणि डरकाळ्याने संपूर्ण जंगल हादरून गेले. दोन वाघांची झुंज आणि त्यांच्या डरकाळ्यांनी जंगलासह पर्यटकही थक्क झाल्याचे पाहायला मिळाले.