Ketki Chitale Post Controversy : केतकी चितळेला घेऊन ठाणे गुन्हे शाखा नवी मुंबईला रवाना - ठाणे गुन्हे शाखा केतकी चितळे
🎬 Watch Now: Feature Video
ठाणे - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( NCP President Sharad Pawar ) यांच्याबद्दल अपमानास्पद पोस्ट केल्याप्रकरणी ठाणे गुन्हे शाखेने अटक केलेल्या अभिनेत्री केतकी चितळे ( Actress Ketki Chitale Post Controversy ) हिला पुढील तपासासाठी ठाणे गुन्हे शाखेने ( Thane Crime Branch ) तीला घेवून नवी मुंबईला ( Navi Mumbai ) रवाना झाले आहे. नवी मुंबईतील कळंबोली येथे केतकी राहते. वादग्रस्त पोस्ट प्रकरणात ठाणे गुन्हे शाखेने अधिक तपासासाठी ठाणे न्यायालयाकडे पोलीस कोठडी मागितली होती. केतकीला ठाणे सत्र न्यायालयाने १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. केतकीच्या घरातील लॅपटॉप आणि इतर गोष्टी तपासण्याची शक्यता वर्तविली जात आहे.