Sword Attacked In Malegaon : मालेगावात खुलेआम गुंडाचा हैदोस; प्रकार सीसीटीव्हीत कैद - Swords Attacked In Malegaon
🎬 Watch Now: Feature Video
मालेगाव - मालेगावात तलवारीने दोन तरुणावर केला ( Sword attack in Malegaon ) जीवघेणा हल्ला केल्याने तरुणाला पाय गमवावा लागला आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाकी असून त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (video viral on social media ) होत आहे. हातात नंग्या तलवारी घेऊन गुंडाच्या टोळक्याने धुमाकूळ घालत 2 तरुणांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना मालेगावच्या पवारवाडी भागात घडली. हल्ल्यात एका तरुणाचा पाय तोडण्यात आला असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. टोळक्याने हल्ला केल्यानंतर दोन्ही तरुण जीव वाचविण्यासाठी सैरावैरा धावत असून गुंडांनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर हल्ला केल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून गुंडाचा तपास सुरू केला आहे.