Security At Vidhan Bhavan : विधान भवन परिसरात पोलिसांचा कडा पहारा

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail
मुंबई - महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध करण्यास सांगत राज्यपालांनी विशेष अधिवेशन बोलवले आहे. अधिवेशनात शिवसेनेचे बंडखोर आमदारही ( Shivsena Rebel MLA ) येणार आहेत. या आमदारांविरोधात शिवसैनिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. विधानभवन परिसरात किंवा राज्यभरात याचे पडसाद उमटून कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबई पोलीस सहाय्यक आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी विधानभवन परिसराचा आढावा घेतला. झोन 1 चे पोलीस उपायुक्त हरीबालाजी यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. आजपासूनच विधानभवना बाहेर चोख बंदोबस्त ( Vidhan Bhavan Police Security ) वाढवण्यात आला आहे.
Last Updated : Jun 29, 2022, 9:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.