Sahastrakund waterfall : विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवरील सहस्त्रकुंड धबधब्याचे सौंदर्य; पाहा व्हिडिओ - Sahastrakund Falls Yavatmal
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-15803193-thumbnail-3x2-yavtmal.jpg)
यवतमाळ - जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या तसेच विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर असलेला सहस्त्रकुंड धबधबा पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय आहे .पावसाळा सुरू झाला की पर्यटकांना सहस्त्रकुंड धबधबा पाहण्याची ( tourists to see Sahastrakund waterfall ) आतुरता लागते. ३० ते ४० फुटावरून कोसळणारा जलप्रपात पाहण्यासाठी सध्या पर्यटक गर्दी करत आहे. खवळलेल्या नदीचे सुंदर रूप पाहण्यासाठी विदर्भ,मराठवाडा,आंध्र प्रदेश,तेलंगणा येथून पर्यटक धाव घेत आहे.धबधब्याचे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी प्रशासनाने उंच मनोरे तयार केले आहे. तेथून सेल्फी फोटो काढून पर्यटक आनंद घेत आहे.