Ganeshotsav 2022 : दगडूशेठ गणपती ट्रस्ट आयोजित अथर्वशीर्ष पठणाला महिलांची विक्रमी उपस्थिती, ३१ हजार महिलांनी केला मंत्रोच्चार - Record Atendance of Women
🎬 Watch Now: Feature Video
पुणे ॐ नमस्ते गणपतये, त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि असे ३१ हजार महिलांच्या मुखातून अथर्वशीर्ष पठणाचे Atharvashirsha Chanted From 31 Thousand Women सामूहिक स्वर उमटले. ऋषिपंचमीच्या पहाटे Moning of Rishi Panchami श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर Shrimant Dagdusheth Ganpati Festival आदिशक्तीच्या मंत्रोच्चाराने वातावरण मंगलमय झाले होते. कोविड संकटानंतर दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर यंदाच्या गणेशोत्सवात हा सोहळा गणेशभक्तांनी अनुभविला. यंदा अथर्वशीर्ष पठणाचे 35 वे वर्ष आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट Shrimant Dagdusheth Halwai Public Ganapati Trust,, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ऋषिपंचमीनिमित्त पहाटे ३१ हजार महिलांनी उत्सव मंडपासमोर अथर्वशीर्ष पठण केले. गणेशनामाचा जयघोष करीत महिलांनी पहाटेच्या मंगल समयी प्रसन्नतेची अनुभूती दिली. प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल Renowned singer Anuradha Paudwal, परिमंडळ १ च्या पोलीस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे Deputy Commissioner of Police Priyanka Naranvare यावेळी उपस्थित होत्या.