Video : 'लाखो शिवभक्तांमध्ये एक श्रावणकुमार', कावडमधून भोलेनाथांच्या दर्शनासाठी वृद्ध आईवडिलांना घेऊन जाणाऱ्या श्रावण - कावड यात्रा लेटेस्ट व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
डेहरादून ( उत्तराखंड ) - उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार ( DGP Ashok Kumar, Uttarakhand) यांनी आपल्या ट्वीटर अकांऊटवर कावड यात्रेचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या वृद्ध आईवडीलांना कावड यात्रेसाठी नेत असल्याचे दिसते. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, जिथे आजकाल काही ठिकाणी आपल्या वृद्ध आई-वडिलांना तुच्छ लेखले जाते, त्यांना घरातून हाकलून दिले जाते किंवा त्यांच्यासोबत राहू दिले जात नाही. तर आज उलटेच दृश्य पाहायला मिळाले. आपल्या वृद्ध आई-वडिलांसोबत पालखीत बसून कावड यात्रेला आलेल्या लाखो शिवभक्तांमध्ये एक श्रावणकुमारही दिसुन आला आहे. ( Uttarakhand DGP Ashok Kumar tweeted video )