Eknath Shinde : बाळासाहेबांचे नाव तुम्ही कसे वापरू शकता? बंडखोर आमदारांना शिवसैनिकांचा प्रश्न - Crisis Mhavikas Aghadi
🎬 Watch Now: Feature Video

पुणे - शिवसेनेचे बंड नेते आमदार एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्यासोबत शिवसेनेतील ४० आमदारांनी बंडखोरी करत पक्षालाच आव्हान दिल्याचं गेल्या काही दिवसांत दिसून आलं आहे. आत्ता एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटाचं नाव ठरल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाचं नाव ‘शिवसेना बाळासाहेब’ असं ठेवण्यात आल्याचं वृत्त समोर येत आहे. या नावामध्ये बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray ) यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामुळे या नावावर शिवसेनेकडून कायदेशीर आक्षेप ( Legal objection from Shiv Sena ) घेतला जाण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. एकनाथ शिंदे यांनी हे जे नाव दिलं आहे त्याला शिवसैनिकांनी विरोध ( Shiv Sainiks oppose Balasaheb name) केला आहे.