VIDEO : मंत्रीमंडळ विस्ताराची आम्हालाही उत्सुकता - प्रताप सरनाईक - प्रताप सरनाईक
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांचा आज ( गुरुवारी ) मुंबई दौऱ्यावर आहेत. त्या भाजपाआमदार खासदार त्याचबरोबर शिंदे गटाचे आमदार यांची सदिच्छा भेट घेणार आहेत. मुंबईतील पंचतारांकित लीला हॉटेल येथेही भेट होणार असून या बैठकीमध्ये आमदार व खासदारांना मार्गदर्शन सुद्धा केले जाणार आहे. १८ जुलैला राष्ट्रपतीपदाची निवडणूक होत असून भाजपाला शिंदे गटासोबत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनेही पाठिंबा दिला आहे. परंतु आतापर्यंत राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मग त्या कुठल्याही पक्षाचा असोत या सहकार्याची अपेक्षा करत मातोश्रीवर गेलेले आहेत. परंतु यंदा द्रौपदी मुर्मू या जाणार की नाहीत याबाबत आपणाला माहिती नसल्याचे या बैठकीसाठी उपस्थित असलेले शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे. मंत्रीमंडळ विस्ताराची आम्हालाही उत्सुकता लागली असल्याचेही सरनाईक यांनी सांगितले आहे.