SSC And HSC Result 2022 : बारावीचा निकाल जूनच्या दुसऱ्या आठवड्यात, तर दहावीचा शेवटच्या आठवड्यात - वर्षा गायकवाड - दहावी आणि बारावी निकाल तारीख
🎬 Watch Now: Feature Video
शिर्डी - दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना आता आपल्या निकालाची ( SSC And HSC Result 2022 ) प्रतीक्षा लागली आहे. या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बुधवारी ( आज ) अधिकृतपणे दहावी आणि बारावीचा निकाल कधी जाहीर होणार याची माहिती दिली आहे. पुढच्या म्हणजेच जूनच्या दुसऱ्या आठवड्यात 12 वीचा निकाल लागू शकतो. तर जूनच्या शेवटच्या आठवड्यात दहावीचा निकाल लागू शकतो, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड ( School Education Minister Varsha Gaikwad ) यांनी दिली आहे. त्या शिर्डीत बोलत होत्या.