Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा 'रुद्रावतार', ड्रोनने टिपली खास दृश्ये
🎬 Watch Now: Feature Video
नांदेड - पैनगंगा नदीवरील ( Panganga River )आणि मराठवाडा-विदर्भाच्या सीमेवर ( Marathwada-Vidarbha borders )असलेला सहस्त्रकुंड धबधबा ( Sahastrakund Water Fall ) हा आता ओसांडून वाहत आहे. निसर्ग प्रेमींना आकर्षित करत आहे. संततधार पावसाने नांदेडमध्ये पैनगंगा नदी ( Panganga River in Nanded )दुथडी भरून प्रवाहित झाली आहे. त्यामुळे सहस्त्रकुंड धबधब्याचा रुद्रावतार ड्रोन कॅमेराने पहायला मिळतो आहे. आठवडाभराच्या संततधार पावसाने हा धबधबास इतक्या जोरात वाहत आहे. या पूर सदृश्य पाण्यामुळे हदगाव, हिमायतनगर आणि किनवट तालुक्यातील ( Hadgaon, Himayatnagar and Kinwat taluka )अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तर या तिन्ही तालुक्यातील काही गावांचा संपर्क तुटला ( Villages lost contact ) आहे. त्याच बरोबर काही गावातील विद्युत पुरवठा देखील ठप्प झालाय.